Ads Area

Buldhana Nagar Parishad : बुलढाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यात जुंपली; घराणेशाहीवर बोट, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

Buldhana Nagar Parishad Election 2025 :  नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत दोघांच्याही पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीतील दोन मित्र पक्षांच्या नेत्यांच्या पत्नी आमने-सामने निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे बुलढाण्यात आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाने वातावरण ढवळून निघालं आहे.

Sanjay Gaikwad:  पंधरा वर्षे सत्ता होती. स्वतःच घरही टिकवता आलं नाही

भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना म्हटलं की, बुलढाण्यातील जनता ही सुज्ञ आहे. या जनतेला बुलढाण्यातील वातावरण भयमुक्त, दहशतमुक्त व घराणेशाही मुक्त हव आहे. यावर उत्तर देताना शिवसेनेच्या शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटल आहे की, यांच्याकडे पंधरा वर्षे सत्ता होती. यांना स्वतःच घरही टिकवता आलं नाही. सत्ता असताना हे मुंबईतील डान्सबारमध्ये जाऊन तेथील महिलांशी चाळे करत होते. त्यांना सत्ता असताना जनतेची सेवा करता आली नाही. या दोन्ही नेत्यांच्या आरोपांच्या जुगलबंदी वरून बुलढाण्यात भाजपा आणि शिवसेनेत ऑल इज वेल नसल्याच समोर आल आहे.

Buldhana Election : नशामुक्त बुलढाणा, भाजपचा नारा

भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना म्हटलं की, "बुलढाण्यातील जनता ही सुज्ञ आहे. बुलढाण्यातील जनतेला भयमुक्त, दहशतमुक्त आणि घराणेशाही मुक्त वातावरण हवं आहे. हे शहर शांत आणि संयमी लोकांचं आहे. या शहरामध्ये एखाद्या परिवारामध्ये सत्तेची किती भूक असावी? मुलगा, पत्नी, व्याही, पुतण्य़ा , भाचा हे नगरपालिकेत आणि जावई जिल्हा परिषदेवर अशी एकाच घरात किती सत्ता असावी? एकाच घरात एवढी सत्ता आल्यावर ते अराजकतेकडे जातात. त्यामुळे भयमुक्त, नशामुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त शहर हा आमचा नारा आहे."

तर दुसरीकडे विजय शिंदे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, मी माझ्या परिवारातील तीन तिकिटं कापली आहेत. तुम्हाला तुमचं घर सांभाळतं आलं नाही, कार्यकर्त्याला मोठं करता आलं नाही. तुला संध्याकाळी नशा केल्याशिवाय जमत नाही आणि तू काय नशामुक्त बुलढाणा करणार? पंधरा वर्षे सत्ता असताना यांनी जनतेची सेवा न करता मुंबईतील डान्सबारमधील महिलांशी अश्लील चाळे केले. जनतेची सेवा न करता अय्याशी केली असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या:

मंत्री बाबासाहेब पाटलांनी गद्दारी केली, त्यांना धडा शिकवणार, संभाजी पाटील निलंगेकरांचा हल्लाबोल, लातूरमध्ये युतीत बिघाडी

from BLOG : भाजप आणि शिंदेसेना युतीचा नवा अध्याय... https://ift.tt/YAwN7zE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area