<p>Maharashtra Live blog updates: बीड नगरपालिके बाहेर भाजपा आणि एमआयएममध्ये मंगळवारी रात्री हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. आज उमेदवारी अर्जाची छाननी होती आणि याच दरम्यान रात्री उशिरा भाजपा नेते योगेश क्षीरसागर नगरपालिके बाहेर आले असता त्यांच्यासमोरच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. एमआयएम आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं यादरम्यान पाहायला मिळालं. आणि दोन्ही समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काही धार्मिक घोषणाबाजी केली. आणि वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. आणि याला जशाच तसे उत्तर भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्याचं योगेश क्षीरसागर यांनी म्हटलं.</p>
from ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार https://ift.tt/0wrDvFA
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
November 18, 2025
0