<p><strong>Maharashtra Rains Live Updates: दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय. इतका इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालं. धाराशीव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं. तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आलीय. राज्यभरात 70 लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झालंय. यासाठी 2100 कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करुन मदत देण्याचे आदेश आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आले. सर्व मंत्र्यांनी दुष्काळी दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी <a title="धाराशिव" href="https://ift.tt/T32RzkU" data-type="interlinkingkeywords">धाराशिव</a>मधील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...</strong></p>
from Navi Mumbai Airport Inauguration Update | ३० सप्टेंबरला नाहीच, 'D.B. Patil' नावावर विश्वास! https://ift.tt/7aKcw6J
Maharashtra Rains Live Updates: सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद
September 23, 2025
0