Ads Area

Ajit Pawar Beed Rain: आम्ही कुठेही वगळा-वगळी करत नाही; निवेदनकर्त्याला अजितदादांनी सकाळीच झापले, बीडमध्ये काय घडले?

Ajit Pawar Beed Rain: उपमुख्यमंत्री तथा बीडचे (Beed Rain News) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (25 सप्टेंबर) सकाळी 6 वाजताच बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे. बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट या गावातून सुरुवात होत आहे. त्यानंतर हिंगणी खुर्द, खोकरमोहा, येवलवाडी या गावचा पाहणी दौरा केल्यानंतर गेवराई मतदार संघातील नुकसानग्रस्त पिकांची आणि भागाची (Beed Farmer Panchanama) अजित पवार पाहणी करतील.

अजित पवारांच्या (Ajit Pawar In Beed) दौऱ्याला सुरुवात होताच बीड मधील काही पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केली. मात्र अजित पवारांनी या कार्यकर्त्याला सकाळी झापले. आम्ही कुठेही वगळा-वगळी करत नाही. आता कलेक्टर आले ते काय?, असं म्हणत निवेदनकर्त्याला अजितदादांनी झापले. बीड तालुक्यातील काही महसूल मंडळ वगळण्यात आली होती. आणि याच महसूल मंडळाचा नुकसानग्रस्त भागात समावेश करावा. अशी मागणी या निवेदनकर्त्याने केली होती.

पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता- (Chance To Heavy Rain Again)

हवामान खात्यानं असं सांगितलंय, पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27, 28, 29, 30 या चार दिवसात अतिवृष्टी होऊ शकते. ती पण काळजी सर्वांना घ्यावी लागेल. असं अजित पवार म्हणाले. यंत्रणा देखील राबतेय, सतत पाऊस असल्यानं एअरलिफ्ट करावं लागतंय, एनडीआरएफची टीम जातेय, आर्मीची टीम राबतेय, यंत्रणा अडचणीतील माणसांना दिलासा देण्याचं काम सुरु आहे. उद्यापासून पंचनामे जास्त गतीनं सुरु होतील, असं अजित पवार म्हणाले. पावसामुळं झालेल्या नुकसानाचे पंचनामे व्यवस्थित करा, संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी जे काही करायला लागेल ता करा, अशा सूचना दिल्याचं अजित पवार म्हणाले. पंचनामे झाल्यानंतर आपल्यापुढं आकडे येतील, किती लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालंय, किती नुकसान झालंय याची आकडेवारी येईल. आम्ही केंद्राची मदत मिळवणार आहोत. संकटात राज्याला केंद्राचा हातभार लागला तर मदत होते, असं अजित पवार यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार- (NCP MLA-MP Help To Farmer)

अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच सर्व आमदार, खासदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे (Flood In Maharashtra) मोठं नुकसान झालं असून बळीराजाच्या डोळ्या अश्रूंच्या धारा आहेत. बळीराजाचे हेच अश्रू पुसण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

अतिवृष्टीने हाहाकार, पाहणी दौऱ्यानंतर अजित पवार काय म्हणाले..., Video:

संबंधित बातमी:

प्रचंड नुकसान झालंय, माती खरडून गेलीय, पंचनाम्याचा वेग वाढवणार, शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी मदत करणार : अजित पवार

from TOP 25 Superfast News : टॉप 25 बातम्या : 9 PM : 24 Sep 2025 : Maharashtra Floods : ABP Majha https://ift.tt/a0HWgwr

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area