'I Love Muhammad' Controversy : महाराष्ट्रामध्ये 'I Love Muhammad' लिहिलेल्या बॅनर्सचा एक नवा विषय समोर आला आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून हे लोण आता मुंबई (Mumbai) , छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि भंडाऱ्यातही पोहोचले आहे. अशातच आता आय लव मुहम्मदच्या बॅनरवरून सुरू झालेला वाद अखेर कोर्टापर्यंत जाऊन पोहचला आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाई विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. रजा अकादमी आणि मुस्लिम स्टुडंट्स ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे हि जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाच्या वादानंतर दाखल झालेले गुन्हे रद्द करत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या सुटकेची जनहित याचिकेतून मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेशातील अनेक ठिकाणी आय लव मुहम्मद बॅनर लावल्यावरून मोठा वाद झाला आहे. संविधानाच्या आर्टिकल 226 अंतर्गत करण्यात आलेल्या जनहित याचिकेत नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणांना सांप्रदायिक स्वरूप असून ते याचिकाकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सामान्य नागरिक, प्रामुख्याने मुस्लिम समाजातील, पोस्टर, बॅनर्स आणि सजावट करून शांततेत धार्मिक सण साजरा करत असताना त्यांच्यावर दंगल तसेच धमकवल्या प्रकरणी तसेच शांतता भंग केल्याप्रकरणी खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा जनहित याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत अनेक घटनात्मक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले आहे.

आय लव मुहम्मदाला नितेश राणेंकडून प्रत्युत्तर (Nitesh Rane on 'I Love Muhammad' Controversy)

धार्मिक आधारावर अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध फौजदारी कायद्याचा निवडकपणे वापर करता येतो का? आणि तपासादरम्यान पोलीस यंत्रणा BNSS अंतर्गत असलेल्या वैधानिक संरक्षणांना बगल देऊ शकतात का? ते निष्पाप आणि शांततेप्रिय नागरिक असून ज्यांचा कोणताही फौजदारी इतिहास नसून त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआर सांप्रदायिक पूर्वग्रहांमुळे प्रेरित असल्याचा याचिकाकर्त्यांच्या दावा आहे. तसेच मुस्लिम बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन देखील यातून करण्यात आले आहे. आय लव मुहम्मदच्या बॅनरनंतर उसळलेल्या दंगलसदृश्य परिस्थिती प्रकरणी उत्तर प्रदेशात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तर अनेक ठिकाणी पोलिसांकडून अटकेची कारवाई देखील करण्यात आली आहे. आय लव मुहम्मदाला नितेश राणेंकडून देखील प्रत्युत्तर देत आय लव महादेव असे बॅनर्स झळकवण्यात आले आहे. तर हिंदुत्ववादी संघटनांनी आय लव महादेवाचे बॅनर झळकवले आहे.

देशभर गाजत असलेलं प्रकरण नेमकं काय? (Exactly What is the Matter?)

महाराष्ट्रामध्ये 'I Love Muhammad' लिहिलेल्या बॅनर्सचा एक नवा विषय समोर आला आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून हे लोण आता मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि भंडाऱ्यातही पोहोचले आहे. मौलाना तौफिक रजा यांच्या चिथावणीमुळे बरेलीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम युवक रस्त्यावर उतरले आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. या पोस्टर्समुळे हिंदुत्ववादी सक्रिय झाले आणि काही ठिकाणी 'I Love Mahadev' अशी पोस्टर्स झळकली. या वादाची सुरुवात उत्तर प्रदेशातील कानपूरमधून झाली, जिथे 'I Love Muhammad' पोस्टर्स लावल्याने वाद वाढला. पोलिसांनी पंचवीस मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल केले. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या ट्रेंडला विरोध करण्याचं कारण विचारलं. ते म्हणाले, "मै जिसमें मुझे मोहब्बत है और मुसलमान उस वक्त तक मुसलमान नहीं होता जब तक कि वो प्रॉफिट मोहम्मद को अल्लाह का आखिरी नबी रसूल ना माने और उस वक्त उसका ईमान मुकक्कम नहीं होता जब तक कि वो दुनिया में तमाम चीजों का प्रॉफिट मोहम्मद को चाहे।" मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही 'I Love Muhammad' बॅनर्स लावण्यात आले. कर्नाटकमधील दावणगेरीत बॅनर हटवण्यावरून राडा झाला. झाशीमध्ये 'I Love Mahadev' ने उत्तर देण्यात आले. आमदार नितेश राणे यांनी 'I Love Mahadev' असे ट्वीट करत हिंदुत्ववादी भूमिका मांडली. रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली. आमदार रोहित पवार यांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आम्ही शिकलो असतो तर एका इंजिनिअरला काम करु दिल नसतं, अजित पवारांचा अधिकाऱ्यांना टोला

from Drug Destruction | Navi Mumbai मध्ये २६.४८ कोटींचे Drugs नष्ट, मुलांच्या भविष्यासाठी मोठी मोहीम https://ift.tt/L9IoON2
'I Love Muhammad' च्या बॅनरवरून सुरू झालेला वाद अखेर कोर्टात; दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल, देशभर गाजत असलेलं प्रकरण नेमकं काय?
September 26, 2025
0