Ads Area

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी; अजितदादांनी एका दगडात दोन पक्षी मारले, नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलाय. एबीपी माझाने हे वृत्त दिलं होतं, त्यावर शिक्कामोर्तब झालंय. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री असणार आहेत. अर्थात एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचं खातं बदलतं त्यांची खुर्ची वाचवलीय. मात्र झालेला खातेबदल हाही कोकाटेंना एक मोठा इशाराच असल्याचं मानलं जातंय.

अजितदादांनी एका दगडात मारले दोन पक्षी, नेमकं काय घडलं?

खातेपालटावर विरोधी पक्ष टीका करत असले तरी अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. क्रीडा आणि युवक खातं मिळाल्याने अजितदादांचे विश्वासू असलेलेल दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती. दत्तात्रय भरणेंनी खातेवाटपानंतर ही नाराजी उघडही केली होती. मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही दत्तात्रय भरणेंसाठी एक लॉटरी ठरलीय. कृषिखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यावरील वर्णी ही भरणेंसाठी लॉटरीच मानली जातेय. एकीकडे कोकाटेंचा खातेपालट करत अजित पवारांनी कारवाई केल्याचं दाखवलंय. तर दुसरीकडे विश्वासू दत्तामामा भरणेंना कृषिखातं देत अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षा मारल्याची चर्चा रंगली आहे.

राज्य सरकारने काढलेल्या आदेशात नेमकं काय म्हटलंय?

क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६/रवका-१.-महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या नियम ५ च्या तरतुदींस अनुसरून, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यावरुन, याद्वारे, शासकीय अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६(१)/रवका-१, दिनांक २१ डिसेंबर २०२४, यामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत:-
उक्त अधिसूचनेमध्ये,- (एक) नोंद क्रमांक २२ मध्ये, "श्री. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे" यांच्या नावासमोरील, स्तंभ (२) मधील, “विभाग किंवा त्यांचे भाग" या शीर्षाखालील, "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ” या मजकुराऐवजी, "कृषी" हा मजकूर दाखल करण्यात येईल; (दोन) नोंद क्रमांक २५ मध्ये, "अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे” यांच्या नावासमोरील, स्तंभ (२) मधील, “विभाग किंवा त्यांचे भाग” या शीर्षाखालील, "कृषी” या मजकुराऐवजी, “क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" हा मजकूर दाखल करण्यात येईल, असं आदेशात म्हटलं आहे.

दत्तात्रय भरणेंना लॉटरी, कृषी खात्याची जबाबदारी, VIDEO:

संबंधित बातमी:

काँग्रेसने आमदारकी देऊनही गद्दारी, गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर कट्टर विरोधक खोतकरांचा टोला, म्हणाले, भ्रष्टाचार लपवण्यासाठी हा डाव

from Pigeon Feeding Ban | मुंबईत कबुतरांना दाणे, जेलमध्ये जाणे! Special Report https://ift.tt/M0wKOFg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area