Maharashtra Weather Update: नवीन तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या जम्मू काश्मीर आणि त्यालगत उत्तर पाकिस्तानमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील हवामान येत्या 3 दिवसात बदलणाार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय.गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक स्थिती होती. दरम्यान, अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळं राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आता राज्यात येत्या तीन दिवसात तापमान वाढणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय. त्यामुळं नागरिकांना घामाच्या धारा अन् उकाड्याला सामोरं जावं लागणार असल्याचं दिसतंय.

राज्यात गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदवलं गेलं. कोकण, विदर्भात तर 1-3 अंशांनी वाढ झाली होती. आता जरी उत्तरेकडे थंडीची लाट असली तरी येत्या काही दिवसात दक्षिणेकडील काही राज्यांसह उत्तरेतील जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात येत्या ३ दिवसात तापमान कोरडे राहणार असले तरी 2-4 अंशांनी वाढ होणार असल्याचं वर्तवण्यात आलंय.

येत्या तीन दिवसात तापमानात वाढ

राज्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार असले तरी. येत्या तीन दिवसात राज्यात पुन्हा किमान तापमानात वाढणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2-4 अंश सेल्सियसने तापमान वाढण्याचा अंदाज आहे. येत्या चोवीस तासांत विदर्भात 4-5 अंशाने हळूहळू घसरणार आहे. येत्या पाच दिवसात विदर्भात कमाल तापमानात फारसा परिणाम जाणवणार नाही. येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवलंय.

तापमानात काय बदल होणार?

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात येत्या चार ते पाच दिवसात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे. विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तापमानात येत्या 24 तासांत 4-5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ताज्या हवामान अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब हरियाणा भागात थंडीची लाट राहणार असून राज्यात कोरडे हवामान राहणार आहे.

किमान तापमान वाढले

राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली असून याआधी 4-5 अंशांवर असणारा किमान तापमानाचा पारा 19-20 अंशांपर्यंत गेल्याच्या नोंदी झाल्या. मुंबईत तापमान20 अंशांच्याही पुढे गेले होते. तर सांगली, सातारा तसेच बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 17-19 अंशांवर जाऊन ठेपला होता.

from Raj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन https://ift.tt/6dRQK87
थंडी कसली नागरिक उकाड्यानं हैराण! येत्या 3 दिवसात महाराष्ट्रात तापमान बदलणार, हवामान विभागानं काय दिलाय इशारा?
January 01, 2025
0