Ads Area

Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर

पुणे: खंडणी प्रकरणात स्वत:च्या सोयीने पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड यांच्यावरील कारवाईसंदर्भात राज्य सरकारवर नक्कीच दबाव आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दबावाला बळी पडू नये, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. वाल्मिक कराड प्रकरणात पोलीस खात्याचे अपयश दिसून आले. पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे होता, हे माहिती नव्हते, याचे आश्चर्य वाटते. गुप्तचर यंत्रणांनी आपलं अपयश वारंवार समोर आणू नये. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधातील बीडमधील लढ्याला विशिष्ट रंग दिला जात आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते बुधवारी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथील 207 व्या शौर्य दिनाच्या आयोजनाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जानेवारी रोजी अभिवादनासाठी मी आलो आहे. सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी आजही जनता येत असते, ही गोष्ट चांगली आहे. सरकार आपल्या परीने सुविधा पुरवत असते, पण या अपुऱ्या पडत आहेत.  पुढच्या वेळी या सुविधा पुरवल्या जातील अशी अपेक्षा आहे. बार्टीसारख्या संस्था यात लक्ष घालतील. फिजिकलरित्या हा संघर्ष संपला असेल, मात्र मानसिकरित्या सुरूच आहे, असं मी मानतो. तो जो पर्यंत सुरु राहील लोकं अभिवादन करण्यासाठी येत राहतील, अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

समजातील विषमता अणि अमानुष वागणुकीचा हा लढा फिजिकल संपला आहे, मात्र मानसिकरित्या सुरु आहे. परभणी आणि बीडची घटना घडली, मानसिक बदल न झाल्यामुळे अशा घटना घडतात. मानवतावादी लढा ज्यांनी उभा केला त्यांनी परत पुढं यावं म्हणजे हा संघर्ष संपेल. केंद्र आणि राज्य सरकार हे भाजपचे आहे. सगळ्यांनी समोर येऊन प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

कोरेगाव भीमा येथे 207 वा शौर्यदिन

पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. यासाठी कोरेगाव भीमा येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभावर लाखो अनुयायी अभिवादन करणार आहेत. येथील विजयस्तंभाला आकर्षक फुलांची रोषणाई करण्यात आली आहे. विजय स्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शौर्य दिनानिमित्त पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे. या परिसरात 5000 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत. सोहळ्यासाठी जवळपास आठ ते दहा लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी : वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी, केज कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

from Welcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेला https://ift.tt/BWILinN

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area