विस्तार आणि खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक, शंभर दिवसांचा रोड मॅप आणि प्रस्तावित एसटी भाडेवाढीवर निर्णय अपेक्षित

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीची स्थापना, आयपीएस डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली होणार तपास, सीआयडीचा स्वतंत्र तपास सुरूच राहणार

मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारी आटोपून आज नाशकात परतणार, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा उद्या कटगुणमध्ये कार्यक्रम

संभाजीनगरात मंत्रिपदापासून दूर राहिलेल्या अब्दुल सत्तार यांचं शक्तिप्रदर्शन...विश्वास असेपर्यंत शिंदेंना साथ, विश्वास संपल्यानंतर 'निर्णय', सत्तारांचा थेट इशारा...

भोपाळ वायूगळती दुर्घटनेतील यूनियन कार्बाईड कंपनीतला प्रदूषित कचरा ४० वर्षांनंतर काढला, ३७७ टन विषारी कचरा हलवला पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात

शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट, डीएपीवर जास्तीची सबसिडी...तर पीएम पीक योजनेतील ७० हजार कोटी रुपये वितरीत करण्याचाही निर्णय...

एकविरा गडावर फटाक्यांच्या धुरामुळे मधमाश्यांचा भाविकांवर हल्ला, अनेकांना मधमाश्यांचा चावा, भाविकांच्या हुल्लडबाजीने गडावर पुन्हा फटाकाबंदीची मागणी

चंद्रपुरात ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबासह नातीचा मृत्यू, भद्रावतीजवळ हायवेवर यू टर्न घेताना ट्रकची दुचाकीला धडक

from Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंग https://ift.tt/GAmr8Oa
ABP Majha Headlines : 07 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
January 01, 2025
0