<p>Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 डिसेंबर 2024 : ABP Majha</p> <p> विधानसभा अधिवेशनाचा बुधवारचा दिवस गाजला तो बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चर्चेमुळे (Santosh Deshmukh Murder Case). मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी नवीन दावा केला. ज्या सुदर्शन घुलेची देशमुखांसोबत मारहाण झाली त्याला त्याच्या 'आका'चा फोन आला असं धस म्हणाले. त्यामुळे या हत्या प्रकरणात आरोपींना आदेस देणारा आका कोण असा सवाल आता उपस्थित होतो. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील हा आका कोण हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत धस यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. Suresh Dhas Vidhansabha Speech : आमदार सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणी मांडलेले मुद्दे तीनदा आमदार होणं सोपं आहे. पण गावचा तीनवेळा सरपंच होणं अवघड आहे. एकदा लोकनियुक्त सरपंच झाला. गावातल्या लेकराला मारलं म्हणून तो त्या ठिकाणी गेला आणि त्याला जाब विचारला. सुदर्शन घुले याने मस्साजोगच्या एका दलित वॉचमनला मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या सरपंचालाही घुलेने मारली. मग त्यावर सरपंचानेही मारलं. त्या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी आणि अॅस्ट्रॉसिटी केस दाखल करण्यासाठी संतोष देशमुख पोलिस ठाण्यात गेले. पण त्यांना तिथे बसवून घेण्यात आलं. त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. कंपनीची फिर्याद आणि दलित मुलाची फिर्यादही दाखल करून घेण्यात आली नाही. त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद करून घेतली आणि त्यांना हाकलून देण्यात आलं. </p> <p> </p>
from Special Report on Mumbai Boat Accident : दुर्घटनेची लाट, मृत्यूचं तांडव, पर्यटकांवर काळाचा घाला https://ift.tt/LKsRVqu
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 डिसेंबर 2024 : ABP Majha
December 18, 2024
0