Maharashtra Weather: गेल्या काही दिवसात उत्तरेकडील शीत लहरींचा वाढलेल्या प्रभावामुळे राज्यात चांगलाच गारठा वाढलाय. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान शुन्याखाली गेलंय. राज्यात पुढील तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात तापमानात काहीशी चढउतार संभवते.दरम्यान, विदर्भात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून उत्तर महाराष्ट्रही गारठलाय. जळगावात बुधवारी 8.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर बहुतांश ठिकाणी 10 अंशांखाली तापमान गेले होते.

भारतीय हवामान केंद्राचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी तापमानाचा पारा घसरल्याचे सांगत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बुधवारी किमान तापमानाच्या नोंदी सांगितल्या आहेत. राज्यात काल 8.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नांदेडमध्ये 8.9 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली.नाशिक, बारामती, उद्गीर, नागपूर जिल्ह्यात 9 अंशांवर तापमान गेलं होतं. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली असून धाराशिव 8.6, नांदेड 8.9 अंश सेल्सियसवर होते.कुठे कसं होतं तापमान पाहूया..

18 डिसेंबर, Tmin महाराष्ट्र

परभणी 10.1
सातारा 10.1
चिकलठाणा 11
सांगली 11.6
MWR 13.5
उदगीर 9.4
Slp 12.4
नांदेड 8.9
हर्णै 19.4
आ'नगर 7.4
ठाणे 20 Klp

14.14.1819 R

पुणे. धाराशिव 8.6
मालेगाव 11
बारामती 9
माथेरान 13.6
जळगाव 8.4
नाशिक 9

पुणे शहराचा पारा 6.5 अंशांवर

पुणे शहरासह जिल्ह्यात सोमवार पाठोपाठ मंगळवारी देखील थंडीचा कडाका जाणवला. एनडीए भागाचे तापमान मंगळवारी 6.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. शहराच्या किमान तापमानात काही भागात मंगळवारी देखील घट दिसून आली. एनडीए येथे सोमवारी 6.1 तर मंगळवारी 6.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. शिवाजीनगरचे तापमान सोमवारी 7.8 अंश सेल्सिअस होते ते मंगळवारी 8 अंशांवर गेले. तर उर्वरित भागाचे तापमान किंचित वाढले होते.

महाबळेश्वरमध्ये वेण्णालेकवर दवबिंदू गोठले

महाबळेश्वर शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. सोमवारी रात्री थंडीत वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे वेगवेगळे क्षण अनुभवता येत आहेत. वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. या परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोट्या पोटवल्याचं दिसून आलं.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/o53k8nK Update: महाराष्ट्र थंडीने गारठला! महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले, विदर्भात थंडीची लाट, तापमान किती अंशावर.. जाणून घ्या

from ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024 https://ift.tt/TjEN0xa
IMD Alert:थंडीचा कडाका प्रचंड वाढला, जळगाव 8.4 अंश, 'या' भागांत किमान तापमान कमालीचं घसरलं-IMD
December 18, 2024
0