दोन दिवसांपूर्वी मुंबईत माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहेमान यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात MIM चे खासदार इम्तियाज जलील, माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान उपस्थित होते. यावेळी बोलताना माजीमंत्री आरिफ नसीम खान यांनी आपल्या भाषणात MIM वर हल्ला चढवला होता. मंचावर उपस्थित असलेल्या खासदान जलील यांना उद्देशून नसीम खान यांनी एक प्रश्न उपस्थित केला. ते जलील यांना म्हणाले की, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक का लढवली? नसीम खान यांनी असा प्रश्न विचारताच भर कार्यक्रमात MIM च्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. नसीम खान यांना प्रत्युत्तर देतानाच
काँग्रेसचे नेते आहेत, जे लहान आहेत, पण स्वतःला मोठे समजतात, आमदारकीही हरलेत : इम्तियाज जलील
काल (सोमवार, 8 ऑक्टोबर) रात्री बुलढाण्यातील लोणार शहरात खासदार इम्तियाज जलील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जलील यांनी बोलताना माजी मंत्री आरिफ नसीम खान यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी मुंबईत एका कार्यक्रमाला उपस्थित होतो, त्या कार्यक्रमात काँग्रेसचे एक नेतेही उपस्थित होते. काँग्रेसचे नेते आहेत, जे लहान आहेत, पण स्वतःला मोठे समजतात, आमदारकीही हरले आहेत."
मुंबईतील कार्यक्रमात बोलताना आरिफ नसीम खान यांनी जलील यांना बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक का लढवली? त्यावरही जलील यांनी बोलताना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ते मला म्हणतात बिहारमध्ये का गेलात? अरे बिहारमध्ये गेलो कारण, सहा जागांवर निवडणूक लढवली आणि त्यापैकी पाच जागांवर निवडून आलो. ते म्हणाले पश्चिम बंगालमध्ये का गेलात? ते सोडा, तुम्ही सांगा इथून कोणालाच का नाही निवडून आणलं? असं म्हणत नसीम खान यांच्यावर हल्ला चढवला आहे. तसेच, कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना डान्सची प्रॅक्टिस सुरू करा, आगामी निवडणुकीनंतर तुम्हाला मी खूप नाचवणार आहे, असं जलील म्हणाले. जलील यांच्या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
from maharashtra https://ift.tt/mpKQ8ke
Maharashtra Politics: काँग्रेसचे एक नेते आहेत, लहान आहेत, पण स्वतःला मोठे समजतात; इम्तियाज जलील यांचा माजी मंत्र्यावर हल्लाबोल
October 09, 2023
0
Tags