Ads Area

Maharashtra Politics: जो समोर येईल, त्याला आम्ही अंगावर घेणार; आमदार चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान

Chandrakant Patil On Rohini Khadse : आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाच्या शरद पवार (Sharad Pawar Group) गटाकडून जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदार संघात (Muktainagar Assembly Constituency) आपल्याला पक्षानं उमेदवारी जाहीर केली असल्याचं वक्तव्य रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी उत्तर देत थेट रोहिणी खडसेंना आव्हान दिलं आहे. जो समोर येईल त्याला आम्ही अंगावर घेणार असल्याचं सांगत रोहिणी खडसे यांना आमदार चंद्रकांत पाटलांनी थेट आव्हान दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये  जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलं आहे. तसेच, आपण या तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार असल्याचा दावाही रोहिणी खडसे यांनी केला आहे. एवढंच नाहीतर आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं आपण गेल्या चारवर्षांपासून तयारीलाही लागलो असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. या विषयावर मुक्ताईनगर तालुक्यातील त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थे आव्हान देत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मी प्रतिस्पर्धी असल्यानं निवडणुकीत जो समोर येईल, त्याला अंगावर घेण्याची तयारी ठेवलीये : आमदार चंद्रकांत पाटील

शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, "प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच त्यांनी उमेदवारी जाहीर केली असेल, त्याला गंभीरतेनं घेण्याची गरज नाही. मी प्रतिस्पर्धी असल्यानं निवडणुकीत जो समोर येईल, त्याला अंगावर घेण्याची तयारी आपण ठेवली आहे. विरोधक शेवटी एकमेकांच्या अंगावर जाणारच आहेत, पण मतदार राजा पुढे जाताना आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा समोर मांडावा लागणार असल्यानं आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत."

"शिंदे सरकार हे जनतेसाठी अतिशय सकारात्मक असल्यानं आपल्या मतदार संघात शेतकऱ्यांची आणि जनतेची कामही लवकरात लवकर होत आहेत. त्यामुळे आपल्याला अडचण येणार नाही. मागील निवडणुकीत आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलो होतो, त्याला राष्ट्रवादी पक्षासह शिवसेनेनेदेखील आपल्याला पाठिंबा दिला असल्यानं जनतेनंही साथ दिल्यानं आपण निवडून आलो होतो.", असंही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

from maharashtra https://ift.tt/9WVTMBJ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area