Ads Area

Maharashtra News Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

3rd March Headlines : राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक होणार आहे.  खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग मांडला या संदर्भात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस

राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.  या चर्चा करताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेक आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.  शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरती विरोधक आक्रमक राहाणार आहेत.

संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रकरण

विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक होणार आहे.  खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग मांडला या संदर्भात चर्चा होणार आहे. समितीचे अध्यक्ष राहुल कूल यांच्या उपस्थितती होणार बैठक.

यवतमाळमध्ये  हिंदू जनगर्जना सभा रॅली

लव जिहाद धर्मांतर, गोहत्याबंदी कायदा यासाठी हिंदू जनगर्जना सभा रॅली नेर येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. याला कालीचरण महाराज, बाबूसिंग महाराज पोहरादेवी सहभागी होणार आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. राजकीय हेतून ईडीमार्फत अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा अर्जात उल्लेख. अटकपूर्व जामीन अर्जाला, ईडीचा विरोध. नाविद, अबीद आणि साजिद या हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांनी केलाय अटकपूर्व जामीनासाठी अर्ज.

ठाकरे गटाचा मेळावा

ठाकरे गटाच्या मेळाव्याला संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, लक्ष्मण हक्के, सुनील प्रभू उपस्थित रहाणार आहेत. सकाळी 11 वाजता, विष्णुदास भावे नाट्यगृह येथे हा मेळावा होणार आहे. मेळाव्यानंतर संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे.

ठाकरे गटात पक्ष प्रवेश

संजय राऊत यांच्या उपस्थित संध्याकाळी पाच वाजता सातारा येथील काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता साताऱ्यातील शाहू कलामंदिर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.

सुधीर मुनगंटीवार आज सोलापूर दौऱ्यावर

सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी 9.45 वाजता विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेणार आहेत. सकाळी 10 वाजता संत साधू महाराज सेवा समिती मठाला भेट देतील. सकाळी 10.30 वाजता आर्य वैश्य समाज आयोजित परमात्मा श्री विठ्ठल रुक्मिणी आणि वेदांत केसरी ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर परभणी दौऱ्यावर

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज जिल्ह्यात आहेत. सकाळी 11 वाजता महिला समस्यांबाबत सुनावणी घेतील. दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

अमरावतीत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा शिवगर्जना अभियान मेळावा

अचलपूर आणि बडनेरा याठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा शिवगर्जना अभियान मेळावा आयोजित करण्यात आलाय. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे मार्गदर्शन करणार आहेत.

भंडाऱ्यात काँग्रेसचे आंदोलन

गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली असून या महागाईच्या आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज भंडाऱ्यात भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या घरावर काँग्रेसकडून, दुपारी 1 वाजता थाली बजाव आंदोलन केलं जाणार आहे.

from maharashtra https://ift.tt/GYQp2ga

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area