Maharashtra Assembly Budget Session : विधिमंडळाच्या अधिवेशनाचा (Assembly Budget Session) आज पाचवा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उत्तर देणार आहेत. दरम्यान, मागील चार दिवसात विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आक्रमक

शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काल (2 मार्च) विधानभवनात (Vidhan Bhavan) सत्ताधारी आक्रमक झाले होते. याबाबत विधिमंडळाची हक्कभंग समिती स्थापन झाली असून संजय राऊत यांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु आहे आणि त्यासाठी आता विधीमंडळ हक्कभंग समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये राहुल कुल समितीचे प्रमुख असणार आहेत आणि कुल यांच्या अध्यक्षतेखालील 15 सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे.

नेमकं काय म्हणाले होते राऊत?

संजय राऊतांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून 'चोर'मंडळ आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला होता. त्यांनी पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्ही अशी पदं ओवाळून टाकतो, असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेना आणि भाजपवर घणाघात केला होता. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर विधीमंडळ सभागृह आणि बाहेर सत्ताधारी राऊतांच्या विरोधात आक्रमक झाले होते.

राम सातपुतेंच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक

आधीच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु असताना, भाजप आमदार राम सातपुते यांच्या एका वक्तव्याने दुसरा वाद निर्माण झाला. सभागृहात बोलत असताना राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. अजित पवारांनीही राम सातपुते यांच्या माफीची मागणी केली. अकेर सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वाद मिटला. मात्र, राम सातपुते यांच्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/CR4P5E6 Rajeev Satav: दारु माफियांच्या सांगण्यावरुन माझ्यावर हल्ला, आमदार प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषदेत आरोप

from maharashtra https://ift.tt/wEbv9Xu
Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस, शेतकरी प्रश्नांसह महागाईच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होणार
March 02, 2023
0
Tags