Buldhana : रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला (leopard attack) केल्याची घटना घडली. ही घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करतवडी शिवारात रात्री घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी शरद तायडे (Sharad Tayday) हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान, या दिवसात वाढत्या तापमानामुळं शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावं लागत आहे. रात्रीची लाईट असल्यामुळं शेतकऱ्यांना धोका पत्करून पिकाला पाणी द्यावे लागत आहेत. अशातच वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळं वन्यजीव विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत.

from maharashtra https://ift.tt/q53UHok
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
March 02, 2023
0
Tags