Ads Area

5 February Headlines : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा  शेवटचा दिवस, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सभा; आज दिवसभरात

5 February Headlines : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज समारोपीय कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. याबरोबरच  नांदेड येथे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होणार आहे. BRS पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील पहिली सभा महाराष्ट्रात नांदेडमध्ये होत आहे. शिवाय अमेरीकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा  शेवटचा दिवस
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज समारोपीय कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यापूर्वी साहित्य संमेलनात उपस्थिती दर्शवून एका परिसंवादात उपस्थित राहणार आहेत.

नांदेड येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सभा

नांदेड येथे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होणार आहे. BRS पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील पहिली सभा महाराष्ट्रात नांदेडमध्ये होत आहे.

अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार नगर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी साडे नऊ वाजता पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे  प्रादेशिक पाणी योजनेचे भूमिपुजन ते करणार आहेत. विशेष म्हणजे याच कामाचे शनिवारी भाजप खासदार सुजय विखे यांनी भूमिपूजन केले आहे.. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूण दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळून दौऱ्यावर आहेत.  सकाळी अकरा वाजता ते लोककला महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.

सासवडमध्ये सत्यशोधक परिषद

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये सत्यशोधक परिषदेचे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, बाबा आढाव, हरी नरके उपस्थित राहणार आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37 वा दीक्षांत समारंभ

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37 वा दीक्षांत समारंभ सकाळी 10 वाजता आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील. तर प्रमुख अतिथी राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार असतील. यासोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी शिक्षण उपमहासंचालक नरेंद्रसिंह राठौर हे मुख्य दीक्षांत भाषण करतील.

अमेरीकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर

अमेरीकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. त्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

from maharashtra https://ift.tt/oiUfL4a

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area