Agriculture News : राज्यातील शेतकरी (Farmers) सध्या विविध संकटांचा सामना करत आहेत. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट येत आहे. पपईला (papaya) सध्या बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. मात्र, पपईच्या पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रोगांच्या प्रादुर्भावामुळं पपईची पाने गळून फळे उघडी पडण्याची भीती असते. त्यामुळं फळ खराब होण्याचे प्रमाण वाढते. पपईवर आलेल्या या रोगामुळं पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पपई उत्पादकांसाठी दुष्काळात तेरावा महिना

देशातील सर्वात मोठा पपई हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी पपईला चांगला दर मिळत आहे. मात्र, पपईच्या बागांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पपईच्या बागा चांगल्या बहरल्या आहेत. पपईला दरही चांगला मिळत आहे. 11 रुपये प्रति किलोने व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावरून पपई खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक गणिते गतिमान होण्यासाठी हे दर चांगले असले तरी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी गत पपई उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. मागील आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरण आणि पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. विषाणूजन्य रोगांमुळं पपईची पाने पिवळे पळून पान गळती होते. तर दुसरीकडे पपईच्या झाडाचा शेंडा अकसून जातो. त्यामुळे पपई फळावर थेट सूर्यकिरण पडून फळ खराब होण्याची भीती जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

पपईची पाने पिवळे पडून पानगळ सुरू

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पपईच्या बागा चांगल्या बहरल्या आहेत. मात्र पपई पिकावर रस शोषणा करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अल्टेनिया नावाचा विषाणूजन्य आजारामुळं पपईची पाने पिवळे पडून पानगळ सुरू झाल्यानं खडे उघडे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विद्यापीठांनी सुचवलेल्या उपाययोजना करुन आपल्याला या रोगावर नियंत्रण आणता येते.

नंदुरबार जिल्ह्यात पपई संशोधन केंद्र सुरू करावं

ऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन आणि कृषी विद्यापीठांनी पपई संशोधन केंद्र सुरू करावे. पपई पिकावर येणारे रोग आणि प्रक्रिया उद्योग यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा पपई उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

<a href="https://ift.tt/i0b4SJn नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत, पपईचे दर ठरविण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेण्याची शेतकऱ्यांची मागणी

from maharashtra https://ift.tt/ZraSzdD
Papaya : पपईला चांगला दर, मात्र विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला; नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
February 03, 2023
0
Tags