Ads Area
5 February In History : नरवीर तानाजी मालुसरेंना वीरमरण, अभिषेक बच्चन, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जन्म, आजचा दिवस इतिहासात महत्वाचा
<a href="https://ift.tt/m49IkcN This Day In History :  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी कोंडाण्याच्या लढाईत तानाजी मालुसरेंना वीरमरण आलं होतं. आजच्या दिवशी बाबा महाराज सातारकर, अभिनेता अभिषेक बच्चन, फूटबॉलपटू रोनाल्डो या दिग्गजांचा जन्म झालेला. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
1670 :  नरवीर तानाजी मालुसरे यांचा मृत्यू  (Tanaji Malusare)
नरवीर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार आणि महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते.  सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात त्यांचे बालपण गेले.  अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजी मालुसरेंनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.  सिंहगडची लढाई फेब्रुवारीमध्ये सिंहगड किल्ल्यावर झाली. मराठा साम्राज्याचे सेनापती तानाजी मालुसरे आणि सिंहगडचा राजपूत किल्लेदार उदयभानसिंग राठोड यांच्यात ही लढाई झाली. यात तानाजी मालुसरेंना वीरमरण आले.
1936 : कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म (Baba Maharaj Satarkar Birthday)
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर  हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. नुकतंच त्यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांचे निधन झाले.
1949 : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा जन्म
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. 1972 च्या बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. प्रशासकीय अधिकारी म्हणून 37 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्या चांगल्या लेखिका देखील होत्या. त्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून 13 पुस्तके लिहिली. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक खूपच लोकप्रिय ठरले. 16 जुलै 2020 रोजी कोरोनामुळं त्यांचं 71 व्या वर्षी निधन झालं
1953 : आजची तारीख ब्रिटनमधील एका रंजक घटनेशी संबंधित
इतिहासातील 5 फेब्रुवारी ही तारीख ब्रिटनमधील एका रंजक घटनेशी संबंधित आहे.  या दिवशी 1953 मध्ये ब्रिटनमधील मिठाईचे अनेक वर्षांचे नियंत्रित वितरण रद्द केले गेले. यानंतर लोकांनी भरपेट मिठाई खाल्ली.  दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तू समान प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात म्हणून साखर आणि तिची उत्पादने आणि इतर वस्तूंचे रेशनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारी 1940 मध्ये यूकेमध्ये अनेक उत्पादनांच्या वितरणावर निर्बंध घालण्यात आले. 1948 पासून कापड, फर्निचर आणि पेट्रोलवरील नियंत्रणे टप्प्याटप्प्याने काढून टाकली जात होती, परंतु ती पूर्णपणे काढून टाकण्यासाठी बरीच वर्षे लागली.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा आज वाढदिवस. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने 2000 सालच्या रेफ्युजी या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. त्याला 3 फिल्मफेअर पुरस्कार, 1 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे. माजी मिस वर्ल्ड विजेती व बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनची पत्नी आहे.
1985 : पोर्तुगालचा जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जन्म
1985 : पोर्तुगालचा जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. रोनाल्डोचे पूर्ण नाव क्रिस्टियानो रोनाल्डो डॉस सॅंटोस एवेरो आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो व्यावसायिक फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. रोनाल्डोने जोसेफ बीकन यांना मागे टाकले ज्यांनी फिफा रेकॉर्डनुसार 805 गोल केले आहेत.
2003: उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव
भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आले. याबाबतची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली.
2004 : पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर
पुण्याची स्वाती घाटे ही एक भारतीय बुद्धिबळपटू आहे. 5 फेब्रुवारी 2004 रोजी तिनं वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा आणि शेवटचा नॉर्म संपादन केला अन् वूमन ग्रँडमास्टर झाली.
इतर महत्वाच्या घडामोडी
1905:  स्वातंत्र्यसैनिक, 1942 च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म
1920 : आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधी घेतली.
1971: आजच्या दिवशी अपोलो-14 अंतरीक्ष यान चंद्रावर उतरून अंतराळवीर सुद्धा चंद्रावर उतरले.
2003 :  ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या ‘हरिजन’ या मराठी अंकाचे संपादक  गणेश गद्रे यांचा मृत्यू
2007 : सुनिता विल्यम्स ही अंतराळात जास्त वेळ राहणारी पहिली भारतीय महिला बनली.
2008: महर्षी महेश योगी यांचे निधन. ते भारतातील प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक योग गुरु एक मानले जातात.
from maharashtra https://ift.tt/k1hCYt6
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Area