Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात (U N Mehta Hospital Ahmedabad) उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांचे उपचार सुरु असताना निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. आजवरच्या परंपरेप्रमाणे शिंदे फडणवीस सरकार विदर्भातून जाता जाता काही पॅकेज जाहीर करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा आराखडा सांगताना अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. विधान परिषदेत सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सत्ता पक्षाची आणि विरोधकांची पत्रकार परिषद होईल.

from maharashtra https://ift.tt/OiFKruP
Maharashtra News Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
December 29, 2022
0
Tags