Maharashtra Winter Session Live Updates: अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session) आज अखेरचा दिवस आहे. आजवरच्या परंपरेप्रमाणे शिंदे फडणवीस सरकार विदर्भातून जाता जाता काही पॅकेज जाहीर करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा आराखडा सांगताना अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. विधान परिषदेत सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सत्ता पक्षाची आणि विरोधकांची पत्रकार परिषद होईल.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आक्रमक पावित्र्यात असलेल्या विरोधकांकडून आजही आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तर, विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले आहे.

काल विधानसभा आणि विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात आला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना आणि प्रकल्पांसाठी निधी जाहीर केला.. कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्रात आता 'स्वाधार' सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही मोठी घोषणा केली... ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतिगृह सुरू व्हावे... यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी विधानसभेत सांगितलं

विधानसभेत सरकारच्या घोषणा

राज्यात आता 'स्मार्ट अंगणवाडी' होणार 9 हजार कंपन्या व संस्थांना पत्र,800 हून अधिक संस्थांचा अंगणवाडी दत्तक घेण्यास पुढाकार

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पटप्पा-1 ला 9 हजार 279 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता

वडसा देसाईगंज-गडचिरोलीनवीन रेल्वे मार्गासाठी 1 हजार 96 कोटी सुधारित खर्चास मान्यता

विदर्भ, मराठवाड्यातील 70 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता

विदर्भामध्ये एकूण 44 हजार 123 कोटी रुपयांची गुंतवणूक 45 हजार रोजगार निर्मिती होणार

गडचिरोलीत 20 हजार कोटी गुंतवणुकीचा खनिजउत्खनन प्रकल्पास मान्यता

गोसीखुर्द येथे 100 एकरजागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारणार

बुलडाण्यातील अरकचेरीआणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता

सुमारे 1 हजार 918 हेक्टरजमिनीला सिंचनाचा फायदा होणार

लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी

from maharashtra https://ift.tt/e2xOm15
Maharashtra Winter Session Live Updates: आज अधिवेशनाचे सूप वाजणार, अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांच्या पत्रकार परिषदा
December 29, 2022
0
Tags