Ads Area

Heeraben Modi Passes Away : हिराबेन मोदी यांच्या निधनावर विविध स्तरातून शोक व्यक्त

Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांनी ट्वीट करत हिराबेन मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच कायदामंत्री किरेन रिजिजू (Minister Kiren Rijiju) यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. आजच हिराबेन मोदी यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत. हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी मिळताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री श्री @narendramodi की माताश्री, हीरा बा के निधन से मुझे गहरी वेदना हुई है। एक माँ का निधन किसी भी व्यक्ति के जीवन में ऐसी शून्यता लाता है, जिसकी भरपाई असंभव है। दुख की इस घड़ी में प्रधानमंत्रीजी और उनके पूरे परिवार के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूँ। ॐ शांति!
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 30, 2022

विविध स्तरातून हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. आईच्या मृत्यूने माणसाच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते. ही पोकळी भरून काढणे अशक्य असते. या दुःखाच्या प्रसंगी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती! असे ट्वीट करत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माताश्री हिराबेन यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. अत्यंत खडतर आणि संघर्षमय जीवन जगताना हिराबेन यांनी आपल्या कुटुंबाला चांगले संस्कार दिले. त्याच संस्कारातून देशाला नरेंद्रभाईंसारखा नेता लाभली, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिराबेन यांनी श्रद्धांजली वाहिली.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचं समजून दुःख झालं. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख मोठं असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.@narendramodi pic.twitter.com/sOJmioaKCd
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 30, 2022

त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला : विरोधी पक्षनेते अजित पवार

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/txb3dM0 Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

from maharashtra https://ift.tt/okeaN2V

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area