Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. शिवप्रताप दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे हे प्रतापगड येथे पोहोचणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतापगडावरील मुख्य बुरुजावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

राज ठाकरे यांचा कोकण दौरा

मनसे अध्यक्ष आज कोकण दौऱ्यावर असणार आहे. सकाळी 10 वाजता राज ठाकरे कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतील. संध्याकाळी 5 वाजता ते सावंतवाडी येथे पोहोचतील आणि कुडाळ येथे मुक्काम करतील.

नवाब मलिकांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालय देणार निर्णय

प्रकृती अस्वस्थ्यामुळे न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ईडीनं त्यांना गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातून दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचाही आरोप मलिकांवर आहे. त्यांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी सुरु होईल.

महाविकास आघाडीची बैठक

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाची बैठक होणार आहे. ही बैठक अजित पवारांच्या दालनात सकाळी 11 वाजता होणार आहे.

अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम हे आज ईडी कार्यालयात जबाब देण्यासाठी उपस्थित राहतील

मुंबई- माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम आणि दापोलीच्या सरपंचांना ईडीच्या अधिकाऱ्याने समन्स बजावले होते. त्यांना आज ईडी कार्यालयात जबाब देण्यासाठी उपस्थित रहायचं आहे. दापोली रिसॉर्ट, मनी लाँड्रिंग आणि दापोली येथे दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भातली चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यात गोवरचा वाढत प्रभाव, उपाययोजनांसाठी आज होणार बैठक

मुंबई- राज्यात गोवरची साथ मोठ्या झपाट्याने वाढतीये. या बाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. नेमकी साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करतंय, कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आखलेली आहे. यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पत्रकार परिषद दुपारी 12 वाजता होणार आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजयकुमार सिंह यांची पत्रकार परिषद

पुणे- अस्थायी समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजयकुमार सिंग यांची पत्रकार परिषद होणार आहे. संजयकुमार सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाकडून नियुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेब लांडगे यांच्या नेतृत्वाखालील कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्यानंतर ही अस्थाई समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीकडून यावेळच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 11 ते 15 जानेवारी दरम्यान होणार असल्याचं नक्की करण्यात आलंय. सह्याद्री कुस्ती संकुल, वारजे, दुपारी 12 वाजता

आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण

आज दिल्लीला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. नेमबाज प्रशिक्षक सुमा शिरुर आणि रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना यावेळी द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे, राष्ट्रपती भवन, दुपारी 4 वाजता

मुंबई महानगरपालिका प्रभाग 227 की 236 यावर आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई- मुंबई महानगरपालिका प्रभाग 227 की 236 यावर आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी प्रभाग रचनेत 236 प्रभाग असावे याकरिता केली आहे याचिका. शिंदे सरकारने 236 वरून पुन्हा 227 ची प्रभाग रचना केली होती.

शेतकरी दिंडीच्या तयारीसाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार

मुंबई- राष्ट्रवादीकडून काढण्यात येणाऱ्या शेतकरी दिंडीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. शेतकरी दिंडीमध्ये राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी होणार. शेवटच्या दिवशी शरद पवार यात्रेला संबोधित करणार, यशवंतराव चव्हाण सेंटर, दुपारी 4 वाजता.

from maharashtra https://ift.tt/CgZQGTo
Maharashtra News Updates 30 November 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
November 29, 2022
0
Tags