Bhandara News : राज्यात शिंदे-फडणवीस (Maharashtra Government) यांचे सरकार आल्यानंतर महिला विशेषतः मुलींवरील अत्याचार कमी झाल्याचं सरकार सांगत आहे. मात्र भंडाऱ्यात (Bhandara) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटी बसचा (ST Bus) प्रवास सुरक्षित प्रवास म्हटला जातो. मात्र, भंडारा जिल्ह्यातील शालेय विद्यार्थिनींना याचा बराच वाईट अनुभव आला आहे. बस प्रवासा दरम्यान विद्यार्थिनींची छेड काढण्यात येत असल्याने मुलींनी बसचा प्रवास करणे सोडून दिलं असून, शाळा सुटल्यानंतर गावाकडे पायी प्रवास करणे पसंत करीत आहेत. हा प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील असून मोहगाव येथील शाळेतील विद्यार्थिनींनी याबाबत एबीपी माझाकडे कथन केला आहे.

बसमधील प्रवाशांकडून मुलींचा विनयभंग

मात्र, भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थिनींना एसटी बसमधील प्रवासा दरम्यान बसमधील वाईट वृत्तीच्या प्रवाशांकडून या मुलींना स्पर्श करून त्यांचा विनयभंग करण्यात येतो. तसेच हातवारे करून छेड काढण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. मोहगाव येथील शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनींना राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिले आहेत. मात्र, बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन, तसेच सह प्रवाशांच्या रिकाम्या असलेल्या सीटवर बसल्यावर मुलींच्या शरीराला कुठेही स्पर्श केल्या जात असल्याने या मुली बसचा प्रवास टाळून पायदळ 2 किलोमीटरचे अंतर कापून गावाला जात आहेत. याबाबत एबीपी माझाच्या प्रतिनिधीकडून या विद्यार्थीनींना रस्त्यावर गाठून त्यांच्या पायी प्रवासाबाबत विचारणा केली असता, हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

स्वतःचा जीव मुठीत घेऊन पायी प्रवास
मुलगी शिकली पाहिजे!! यासाठी सरकारने विविध योजना अस्तित्वात आणल्या आहेत. असे असताना भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थिनींच्या बसमधील छेडखानीच्या प्रकाराने त्यांना महामार्गावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांपासून स्वतःचा जीव मुठीत घेवून पायी प्रवास करावा लागतोय. राज्य सरकार या मुलींच्या संवेदना जाणून घेतील का? हा खरा प्रश्न आहे.

विनयभंगाचा गुन्हा कसा दाखल कराल?

भारतीय दंड संहिता कलम 354 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येतो. कलम 354 आणि कलम 509 स्त्रियांचे विनयभंगापासून संरक्षण करतात. हा कायदा स्त्रियांच्या हितासाठी आहे. तसाच तो सार्वजनिक जीवनातील नैतिक आणि सभ्य वर्तनाशी संबंधित आहे. म्हणून हा कायदा व्यक्तीचा व्यक्तीशी झालेल्या वर्तनापुरता मर्यादीत नसून त्याकडे सार्वजनिक ठिकाणी सभ्यता आणि नैतिकता पाळणे याच्याशी संबंधित आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबवर संतप्त जमावाकडून तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न; पोलिसानं गन रोखली अन्...

from maharashtra https://ift.tt/zfNu3kR
Bhandara : शालेय विद्यार्थीनींसाठी एसटीचा प्रवास ठरतोय असुरक्षित? प्रवासात विद्यार्थिनींसोबत विनयभंग, भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार
November 29, 2022
0
Tags