Wardha Success Story : कोणतीही गोष्ट मिळविण्याची जिद्द असेल, तर ती मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर साध्य करता येते. तसेच शिक्षणाच्या आड कधीही पैसा येत नाही घरची परिस्थिती हलाखीची असतानाही हे मुस्कान कुळमेथी हिने करुन दाखवले. वर्ध्यातील (Wardha) आर्वी तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुस्कान या विद्यार्थिनीने बुद्धिमत्ता व मेहनतीच्या जोरावर नामवंत वाराणसी हिंदू विश्वविद्यालयातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बनारस येथून पदवी प्राप्त करून आर्वी शहरातील शिक्षण क्षेत्रात आपला ठसा (Success Story) उमटविला आहे.

आर्वीतल्या विद्यार्थिनीने गाठलं यशाचं शिखर!

मुस्कान या विद्यार्थिनीचे वडील आर्केस्ट्रा मध्ये तबला/ढोलक वादक आहेत आणि आई अंगणवाडी मदतनीस आहे. एकूणच घरची परिस्थिती अतिशय साधारण असतांना खूप शिकण्याची आणि पुढे जाण्याची जिद्द, चिकाटी असलेल्या मुस्कानने आय आय टी वाराणसी येथून बी टेकची (B Tech) पदवी मिळवलीय. तिच्या यशामुळे इतर सर्वसामान्य घरातील विद्यार्थिनींना मुस्काने आदर्श निर्माण करून दिला असून जिल्हाभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे..

जेईई परीक्षा पास केली
मुस्कान हिने 2010 मध्ये परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले होते. दहावी पर्यंत वर्धा नवोदय येथे शिक्षण घेतले. 11वी आणि 12 वी पुणे नवोदय येथून केले आहे. आयआयटीची कोचिंग घेऊन जेईई (JEE) परीक्षा पास करून बनारस हिंदू युनिवार्सिटीतून बी टेकची पदवी प्राप्त केली आहे.

मुस्कानचा एमबीए करण्याचा मानस
आई-वडील व शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मार्गदर्शनामुळे हे मी यश संपादन करू शकले असे मुस्कान सांगते. मुस्कानला तिच्या कुटुंबासह आपल्या गावाचं नाव उंचवायचं आहे. त्यामुळे पुढे एमबीएचे शिक्षण घेण्याची इच्छा असल्याची भावना तिने बोलताना व्यक्त केलीय. मुस्कानने एका नामवंत विश्वविद्यालयातून पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे आर्वी तालुका आणि जिल्हाभरातील नागरिकांकडून कौतुक केले जातेय..

इतर महत्वाच्या बातम्या

30 November Headline : प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, मलिकांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालय देणार निर्णय

from maharashtra https://ift.tt/5BaMT2x
Wardha Success Story : घरची परिस्थिती हलाखीची, तरीही तिनं गाठलं यशाचं शिखर! सामान्य कुटुंबातील लेकीची यशोगाथा
November 29, 2022
0
Tags