Raj Thackeray Nashik Tour: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येणार आहेत. शनिवार आणि रविवार म्हणजेच एक व दोन ऑक्टोबर असा त्यांचा दौरा आहे. मात्र हा दौरा राजकीय नसून सप्तशृंगी देवी दर्शनासाठी (Devi Saptashrungi) राज ठाकरे हे नाशिकला येणार असल्याचे समजते.

दरम्यान आज शनिवारी सकाळी साडेआठ वाजता शिर्डी विमानतळावर खाजगी विमानाने राज यांचे आगमन होणार आहे. शिर्डी येथे नाशिक येथील मनसे पदाधिकारी त्यांचे स्वागत करणार आहे. शिर्डीत साईबाबा समाधी दर्शन (Shirdi Saibaba) घेऊन ते परत विमानाने ओझर विमानतळावर दुपारी साडेअकरा वाजता येणार आहेत. या ठिकाणी शहराध्यक्ष पदाधिकारी विद्यार्थी सेना महिला पदाधिकारी यांच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते ओझर विमानतळावरून नाशिक येथे एस एस के हॉटेल येथे येणार आहे येथे रात्री मुक्काम करून ते 2 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेऊन परत ओझर विमानतळ येथून रवाना होणार आहे हा संपूर्ण दौरा खाजगी असल्याने असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

नाशिक मनसेची आढावा बैठक?
एकीकडे राज ठाकरे हे आधी शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेणार असून त्यानंतर नाशिकला ते मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणारा आहेत. मात्र हा राजकीय दौरा नसल्याने ते माध्यमांशी संवाद साधणार नसल्याचे समजते. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनसेला पुन्हा एकदा किक देण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेला बूस्ट देण्यासाठी शहरात १२२ राजदूतांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे मनसे ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसते आहे. आज उद्याच्या दौऱ्यामध्ये राज ठाकरे दर्शनासह मनसे पदाधिकांऱ्याना काय कानमंत्र देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दर्शनमात्रे मन कामना पूर्ती
सण उत्सव निर्बंधमुक्त झाल्यापासून राज्यातील लोकप्रतिनिधी गणेशोत्सव असो कि नवरात्री आदी कार्यक्रमांना भेटी देत असून यामुळे सण उत्सवाचे वातावरण राजकीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव काळात अनेक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. त्यानंतर नवरात्रीच्या निमित्ताने सगळेच लोकप्रतिनिधी मंदिरांना भेटी देत दर्शनाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी साकडे घालत 'दर्शनमात्रे मन कामना पूर्ती' आशा करत आहेत.

from maharashtra https://ift.tt/lr1uAyC
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर; आधी शिर्डीला साईबाबांचं दर्शन तर नंतर सप्तश्रृंगी दर्शनासाठी जाणार
September 30, 2022
0
Tags