ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर आहेत. सेवाग्राम येथील बापू कुटीला जाऊन महात्मा गांधी यांच्या स्मृतीला वंदन करणार आहे आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळचे राज्यस्तरीय महाअधिवेशन आज दुपारी 1 ते 2 वाजता सांगली येथील धनंजय गार्डन मध्ये होणार आहे. यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित रहाणार आहेत.

मुंबईत आरे वाचवा अभियानातील कार्यकर्त्यांचा मोर्चा

आरे कारशेडप्रकरणी गांधी जयंतीचा मुहूर्त साधत आरे वाचवा अभियानातील कार्यकर्ते दुपारी 3 वाजता मोर्चा काढणार आहेत.

गांधी जयंतीनिमित्त मुंबईत 'द्वेष छोडो, भारत जोडो' रॅली

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत 'द्वेष छोडो, भारत जोडो' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांसह विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत राजघाटावर अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंती निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री सकाळी 7.30 ते 8.30 दरम्यान राजघाटावर अभिवादन करतील.

मल्लिकार्जुन खरगे यांची पत्रकार परिषद

कॉंग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

गुवाहाटी येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेत टी 20 सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरू असलेल्या टी 20 मालिकेत भारत आज सिरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत, संध्याकाळी 7 वाजता.

from maharashtra https://ift.tt/jZ2OtJk
Maharashtra News Updates 02 October 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
October 01, 2022
0
Tags