<p>महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झालीय.. निरोप घेता घेता पाऊस राज्याला झोडपण्याची शक्यता आहे.. पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय...मान्सूनचे ४ महिने पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण देशात सरासरीपेक्षा सहा टक्के पाऊस अधिक बघायला मिळाला आहे. तर महाराष्ट्रात २३ टक्के अधिक पाऊस बघायला मिळाला. नाशिक, नागपूर, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची टक्केवारी नोंदवण्यात आलीय. दरम्यान ऑक्टोबरमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय..,. </p>
from maharashtra https://ift.tt/CnqbHQg
Maharashtra मध्ये परतीच्या पावसाला सुरुवात,विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज : ABP Majha
September 30, 2022
0
Tags