Ads Area

Vishwajit Kadam : नव्या सरकारमध्ये फक्त दोनच मंत्री, याला सरकार कसे म्हणायचे? माजी राज्यमंत्र्यांची शिंदे सरकारवर टीका

Vishwajit Kadam :  महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पाडून सत्तेवर आलेल्या सरकारला सरकार म्हणता येणार नाही. नवीन सरकार मध्ये दोनच मंत्री आहेत; एक मुख्यमंत्री आणि दुसरा उपमुख्यमंत्री असे म्हणत काँग्रेस नेते, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी एकीकडे शेतकरी संकटात असताना अजून मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने शेतकऱ्यांचे अश्रू कोण पुसणार? असे म्हणत शिंदे सरकारवर टीका केलीय. सांगलीत पत्रकार परिषदेत कदम बोलत होते.

पूर्ण मंत्रिमंडळ राज्यात अस्तिवात नाही हे दुर्देव

एकीकडे राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे; अशावेळी पूर्ण मंत्रिमंडळ राज्यात अस्तिवात नाही हे दुर्देव आहे. लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी असेही कदम म्हणालेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आझादी गौरव यात्रा काढणार आहोत. या यात्रेत जिल्ह्यातील सर्व नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत असेही कदम म्हणालेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते जितेश कदम आदी उपस्थित होते.

दोनच मंत्री असल्यामुळे याला सरकार म्हणायचे तरी कसे?

राज्यातील जनतेला अनेक समस्यांनी घेरले असताना सरकारच अस्तित्वात नाही. दोनच मंत्री असल्यामुळे याला सरकार म्हणायचे तरी कसे,’ असा सवाल माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. राज्यात सध्या अनेक भागात पूरस्थिती आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत सरकार अस्तित्वात नाही. मंत्रिमंडळही तयार झालेले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोनच मंत्री राज्यात आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणार तरी कोण, असा प्रश्न सर्वांना पडला आहे, असे कदम म्हणाले.

माझ्यावर दबावाचा प्रयोग केला नाही - कदम

केंद्र व राज्यातील भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरूच आहे. आता स्थानिक पातळीवरही आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. मिरजेतील ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाबाबत नोटिसा बजावल्या आहेत. त्या चुकीच्या असून, याविरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढू. राज्यातही अशाप्रकारे विरोधी पक्षाच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. काँग्रेस अशा दबावाला बळी पडणार नाही. एकसंधपणे येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही ताकदीने लढवू असा विश्वास देखील कदम यांनी बोलून दाखवलाय. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत मागितलेला इम्पिरिकल डेटा आम्ही पुरविला. त्यामुळेच आरक्षणाबाबतचा अपेक्षित निर्णय मिळाला. यात भाजपने श्रेय घेण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी या प्रक्रियेत काय केले होते? असा सवालही कदम यांनी केला. माझ्यावर दबावाचा प्रयोग केला नाही. भाजप सरकारकडून अनेक नेत्यांवर ईडी व अन्य सरकारी यंत्रणांकडून दबाव आणला जात आहे. मात्र, माझ्यावर असा कोणताही दबाव आलेला नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले.

from maharashtra https://ift.tt/siMtHYU

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area