Maharashtra Rain Update : विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) नागपूरमध्ये रविवारी पावसाने दिवसभर उसंत घेतल्यानंतर त्याच रात्री मात्र शहराला चांगलेच झोडपले होते. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा थोड्या थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, महानगरपालिकेने नियोजन केले नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळालं.

विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिममध्ये बुधवारपर्यंत येलो अलर्ट आहे. तर वर्धामध्ये फक्त आज तर अमरावती आणि अकोलामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र गुरुवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचे संकेत नसल्याचे हवामान खात्याच्या अहवालातून दिसून येत आहे.

सर्वसामान्यांसह आता बळीराजाही कंटाळला

विदर्भात हवामान विभागाचा आणखी दोन दिवस यलो अलर्ट असून त्यानंतर हळू हळू पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान नागपूर शहरात सोनवारी सकाळच्या सुमारास रिमझिम पावसानंतर काही वेळाच्या विश्रांतीनगर पुन्हा पाऊस सुरु झाला. दिवसभर आभाळ भरुन होते. दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसर जोरदार पाऊस बरसल्याने नागपुरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे रस्ते व चौक पुन्हा जलमय झाले होते. पाच आणि सहा जुलै वगळता नागपुरात 30 जूनपासून दररोज पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह आता बळीराजाही कंटाळून गेला आहे. शेतांमध्ये जागोजागी पाणी तुंबल्याने कामे रखडली आहेत. शिवाय अत्याधुनिक पावसामुळे पिकेही पिवळी पडू लागली आहे. पावसामुळे शहरवासीदेखील मेटाकुटीस आले आहेत. काही वस्त्यांमध्ये अजूनही तलाव साचले आहेत.

from maharashtra https://ift.tt/CxQImXg
Maharashtra Rain : विदर्भात पावसाचं थैमान, आजही मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' भागात ऑरेंज अलर्ट जारी
July 18, 2022
0
Tags