Baramati Indapur Teacher News: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) खिंडार पडले असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साथ देण्यासाठी एका शिक्षकाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. 27 जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला आणि त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दीपक खरात यांनी शिक्षक नोकरीचा राजीनामा दिला आणि आता ते पूर्ण वेळ शिवसेनेचे काम करणार आहेत. खरात यांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून शिवसैनिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. गेली 10 वर्ष दीपक खरात हे शिवसेनेचं काम करीत होते. परंतु त्यांना पूर्ण वेळ काम करता येत नसल्याचं खरात सांगतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचं राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी 27 तारखेला दीपक खरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन एक अनोखी भेट उद्धव ठाकरेंना दिली आहे. खरातांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहे.

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी नोकरीचा राजीनामा देणारा राज्यातील पहिलाच शिक्षक

दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते कार्यरत होते. एक फेब्रुवारी 2002 पासून ते सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र. 3 येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत होते. त्यांची आतापर्यंतची सेवा 20 वर्ष सहा महिने इतकी झाली आहे. अनेक जण शिवसेनेला सोडून गेले आहेत तर अनेक जण नव्याने सेनेत प्रवेश करीत आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी नोकरीचा राजीनामा देणारा बहुधा राज्यातील हा पहिलाच शिक्षक असावा. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.

इतर काही महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/iMNOhHt : शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार? आज भूमिका मांडणार, चर्चाना मिळणार पूर्णविराम

<a href="https://ift.tt/icwaL8m Government : शिंदे सरकारला एक महिना पूर्ण, जाणून घ्या महिनाभरातील घडामोडींचा आढावा

from maharashtra https://ift.tt/4izD8PZ
उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी शिक्षकानं सोडली नोकरी, राजीनामा पत्र सोशल मीडियात जोरदार व्हायरल
July 29, 2022
0
Tags