Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) ते पुणे (Pune) या नव्या महामार्गाचा मॅप (New Highway) प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमावर व्हायरल झालाय. विशेष म्हणजे महामार्ग ज्या भागातून जातोय त्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जातोय याची कसलीच माहितीच नाही. तर आपल्या शेतीला काही पट भाव मिळत असल्याने या भागात रोज अनेक व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा नकाशा एबीपी माझाच्या हाती लागला आहे.पण प्रश्न हा आहे की केवळ तीन विभागाकडे असलेला मॅप नेमका व्हायरल झालाच कसा" असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.

New Highway Map Goes Viral : श्रीमंताला अधिक श्रीमंत करतंय कोण?

दरम्यान या प्रकरणी सरकार याची चौकशी करणार का? शेतकऱ्यांचे नुकसान होऊन श्रीमंताला अधिक श्रीमंत कोण करतंय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर नकाशा तयार करण्याची जबाबदारी कोणाची? कुठल्याही महामार्गाचा नकाशा तयार करायचा असेल त्यासाठी एक एजन्सी नेमली जाते. त्यामुळे सहाजिकच हा नकाशात एजन्सीकडे असतो. नकाशा तयार झाल्यानंतर तो सदरील विभागाकडे दिला जातो. त्यामुळे नॅशनल हायवे विभागाकडे हा नकाशा जातो. एमएसआयडीसी या विभागाकडे देखील नकाशा जमा केला जातो. एमएसआयडीसीचे सीई रणजित हांडे यांना आम्ही व्हाट्सअप वर हा नकाशा पाठवला त्यावेळी त्यांनी हा आमचा नकाशा असल्याच एबीपी माझाला सांगितले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय, शेतकऱ्यांकडून आरोप

मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.याचच एक उदाहरण समोर आले आहे.गणेश बापूसाहेब वाडेकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील राहुरी तालुक्यात शेती आहे या शेतात त्यांनी मका लावलेली होती दरम्यान अतिवृष्टीत त्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्यांना 90 गुंठ्यांतही 15300 अनुदान मिळाले तर मराठवाड्यात वैजापूर तालुक्यात त्यांच्या आजींच्या नावे असलेल्या 4 एकर बागायती जमिनी मध्ये त्यांनी लावलेल्या मका पिका ची नुकसान भरपाई म्हणून 9500 रूपये अनुदान जमा झाले आहे.या दोन्ही अनुदानाच्या रकमेचे स्टेटमेंट घेऊन त्यांनी तहसील कार्यालय गाठले. हे केवळ एक उदाहरण अश्याच पद्धतीने श्रीरामपूर राहता व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदान आले मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कवडीमोल अनुदान आले ज्यामुळे या संदर्भात शेतकरी संघटनेकडून सोमवार तारीख 17 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आले आहे.

हेही वाचा

Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?

from Bihar Polls 2025 : Chiraiya चे BJP उमेदवार Lalbabu Prasad Gupta पैसे वाटताना कॅमेऱ्यात कैद? FIR दाखल. https://ift.tt/3RoyMND
धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमावर व्हायरल; जमीन खरेदीसाठी बड्या श्रीमंतांची लगबग
November 11, 2025
0