Solapur News : सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने (RBI) निर्बंध घातले आहे. बँकिंग नियमन अधिनियम 1949च्या कलम 35(अ) आणि 56 नुसार पुढील सहा महिन्यासाठी बँकेच्या व्यवहारवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती आहे. या निर्बंधामुळे (RBI Restrictions) आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवी स्वीकारू शकणार नाही किंवा कोणतीही मालमत्ता विक्री अथवा हस्तांतर करू शकणार नाहीये. तर बँकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास देखील आरबीआयकडून (RBI) मनाई (RBI Restrictions on Samarth Sahakari Bank) करण्यात आली आहे. मात्र ठेवीदारांना DICGC योजनेअंतर्गत त्यांच्या ठेवीवर 5 लाखांपर्यंत ठेव विमा मिळू शकतो, असेही आरबीआयने प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

RBI Restrictions on Samarth Sahakari Bank : बँकेवरील ही बंधने लवकरात लवकर हटतील

दरम्यान, समर्थ बँकेने देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली बाजू स्पष्ट केलीय. गेल्या तीन महिन्यात बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे. तसेच सभासदांचे भागभांडवल दुप्पटीने वाढले आहे. बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी यासंदर्भात भारतीय रिझर्व बँकेच्या संपर्कात असून बँकेवरील ही बंधने लवकरात लवकर हटतील, असा विश्वास समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी व्यक्त केलाय.

Amravati News : अमरावतीत मनपाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई

अमरावती महानगरपालिकेच्या प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला गती देण्यासाठी मनपा सोमय्या शर्मा चांडक यांच्या आदेशाने कडवी बाजार परिसरात मनपाच्या पथकाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा तब्बल चार ट्रक इतका मोठा साठा जप्त केला. इतकंच नाही तर तब्बल पाच गोदाम सील केले आहे. त्यात अंदाज करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लाष्टीकसाठा उपलब्ध आहे.

मनपाचे पथक काल (7 ऑक्टॉम्बर) सकाळपासूनच कडवी बाजार परिसरात दाखल झाले. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात बंदी घातलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, एकदाच वापरायचे कप, प्लेट्स, ग्लासेस आणि अन्य प्लॅस्टिक साहित्य विक्रीसाठी ठेवलेले आढळले. मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित ती सर्व सामग्री जप्त करून तब्बल चार ट्रक प्लॅस्टिकसाठा जप्त केला आणि पाच गोदाम सील केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पूर्वसूचना देऊनही अनेक व्यापारी बंदी घातलेल्या प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपाने ही कठोर कारवाई केली.

ही बातमी वाचा:

Dhravya Shah : केवळ 19 वर्षांचा मुंबईकर ध्रव्य शाह बनला सीईओ! सुपरमेममरी AI स्टार्टअपसाठी 30 लाख डॉलर्सचे फंडिंग

Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे

from Mumbai Construction Accident | जोगेश्वरी पूर्व: बांधकाम साईटवर मुलांचा अपघात, एकाचा मृत्यू https://ift.tt/K3juo4L
RBI: सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; ग्राहकांना खात्यातून पैसेही काढता येणार नाहीत
October 07, 2025
0