<p>Maharashtra Live blog updates: यापुढे वाहनाला पांढरे LED हेड लाईट्स, अवैध सायरन लावाल तर आता होणार मोठा दंड, लेन कटिंग केल्यास होणार कारवाई. रस्ते सुरक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायलायाने दिले सर्व राज्यांना निर्देश. देशातील रस्ते सुरक्षा संबंधात सर्वोच्च न्यायालयाने कडक पावल उचलत सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहे यात वाहनांना पांढऱ्या रंगाचे हेडलाइट्स लावाल, अवैधपणे सायरन लावाल, पोलीस गाड्यांना असतात तसे निळे आणि लाल एलईडी लाईट लावाल, वाहन चालवताना निर्देशित केलेल्या लेन मधूनच वाहन न चालवाल तर मोठ्या दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल सर्व राज्यांना एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिले आहे. प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर एस राजशेकरण यांनी 2012 साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत हे निर्देश देण्यात आले. देशभरात 2023 - 24 या वर्षात रस्ते अपघातात एक लाख 72 हजार 890 जणांचा जीव गेला आणि दरवर्षी हा आकडा वाढतच आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षा संदर्भात सर्व राज्यांना कडक आदेश दिले आहेत</p>
from Priyanshu Kshatriya Death :'झुंड' फेम प्रियांशूची हत्या, 'माझा कट्टा'वर व्यक्त केलेल्या भावना! https://ift.tt/OspqBWh
Maharashtra Live Updates: वाहनांना पांढरे LED हेड लाईट्स, अवैध सायरन लावल्यास होणार दंड
October 08, 2025
0