Hindi-Marathi Language Row: महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) केंद्राच्या त्रिभाषा धोरणातंर्गत राज्यातही त्रिभाषा सूत्र राबवण्यासंदर्भात जीआर काढला होता. तेव्हापासूनच राज्यात मराठी विरुद्ध हिंदी भाषा (Marathi Language And Hindi Language Row) या वादाला तोंड फुटलं. वाढत्या विरोधानंतर राज्य सरकारनं जीआर मागे घेतला खरा, पण तरीसुद्धा हा वाद संपण्याचं नाव काही घेईना. अशातच आता महाराष्ट्र पोलीस खात्यातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला मराठीचं वावडं का? असं विचारण्याची वेळ आली आहे. त्यामागील कारण म्हणजे मिरा रोड झोन वनचे डीसीपी राहुल चव्हाण यांचा मराठीद्वेष उघड झाला आहे.

छठ पूजा मार्गदर्शन बैठकीत मराठी बोलण्याची साधी विनंती केल्यावर, त्यावर या वरिष्ठ अधिकाऱ्याने मराठी एकीकरण समितीच्या (Marathi Ekikaran Samiti) खजिनदारालाच झापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नम्रपणे विनंती डीसीपी राहुल चव्हाण यांना खटकली, हिंदीतच बोलत राहिले

दरम्यान, या घटनेवर मराठी एकीकरण समितीने अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग आणि मानवाधिकार आयोगाकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, शनिवारी मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात छठ पूजा मार्गदर्शन बैठक झाली. या बैठकीदरम्यान मराठी एकीकरण समितीचे खजिनदार प्रमोद पार्टे यांनी नम्रपणे विनंती केली की, “सर्वांना मराठी समजते, कृपया मार्गदर्शन मराठीत द्या.” मात्र ही विनंती डीसीपी राहुल चव्हाण यांना खटकली. त्यांनीच पार्टे यांना जोरात झापले आणि पुन्हा हिंदीतच बोलत राहिले. महाराष्ट्रात राहून मराठी न बोलणं म्हणजे भाषेचा अपमान. असे अधिकारी राज्यातील लोकांच्या भावना दुखावत आहेत. असा आरोप पोर्टे यांनी केला. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असताना, राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारीच जर मराठी टाळू लागले, तर हा प्रश्न फक्त भाषेचा नाही, कर तो स्वाभिमानाचा असल्याचाही मत पोर्टे यांनी व्यक्त केलं.

Attack on Press: एबीपी माझाचे पत्रकार यांना धमकी दिल्याप्रकरणी मोठी कारवाई

कल्याणमध्ये (Kalyan) एबीपी माझाचे (ABP Majha) पत्रकार सुरेश काटे (Suresh Kate) यांना धमकी दिल्याप्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. 'बातमी प्रसारित केली तर जीवे मारू', अशी थेट धमकी गावगुंड भाऊ पाटील (Bhau Patil) आणि त्याच्या साथीदाराने दिली होती. कल्याणमधील मोहनेगावात (Mohanegaon) दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीची बातमी 'एबीपी माझा'ने दाखवल्याचा राग मनात धरून ही धमकी देण्यात आली. या गंभीर प्रकाराची कल्याण खडकपाडा पोलिसांनी (Kalyan Khadakpada Police) तातडीने दखल घेतली. पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत (Journalist Protection Act) भाऊ पाटील आणि अन्य एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवरील हा हल्ला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ravindra Dhangekar : मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा, रवींद्र धंगेकर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, 27 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन

from Madan Hari Molsom : नॉर्थ इस्ट इंडिया अवॉर्ड, समाजसेवक मदन हरी मोलसोम यांचा सन्मान https://ift.tt/m4cv2Vo
Hindi-Marathi Language Row: पोलीस खात्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला मराठीचं वावडं? मराठी एकीकरण समितीच्या खजिनदारालाच झापलं
October 25, 2025
0