भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथील एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सॲप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत,' असे खळबळजनक वक्तव्य बावनकुळे यांनी केले. चुकीचे बटण दाबल्यास पुढील पाच वर्षे शहराचा सत्यानाश होईल, असा इशाराही त्यांनी मतदारांना दिला. तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरी करणाऱ्यांना त्यांनी सज्जड दम दिला. जर कोणी पक्षात बंडखोरी केली तर त्यांच्यासाठी नेत्यांची दारे कायमची बंद होतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या विधानांमुळे पक्षांतर्गत शिस्त आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
from Underworld Crackdown: दाऊदचं ड्रग रॅकेट उद्ध्वस्त, दुबईतून सूत्रधाराला अटक https://ift.tt/QbgB87R
Chandrashekhar Bawankule : कार्यकर्त्यांचे फोन सर्वेलन्सवर, बावनकुळेंच्या विधानाने खळबळ
October 23, 2025
0