Ads Area

BMC Elections | Eknath Shinde यांचा 'ठाणे पॅटर्न' मुंबईत, महापौर शिवसेनेचाच होणार!

राज्यातील पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवसांत कमी होणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे, राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बारा वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला जाईल आणि पंचनाम्या संदर्भात चर्चा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ही बैठक होत असल्याने मदतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. मुंबईत 'ठाणे पॅटर्न' राबवला जाणार आहे. विविध समाज, जाती किंवा व्यवसाय निहाय पंचवीस ते तीस सेल्स स्थापन करून मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला जाईल. शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वात पुन्हा कार्यान्वित केली जाईल. या समितीचे दहा हजारहून अधिक सदस्य आहेत, त्यातील बहुसंख्य सदस्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. "मुंबईचा महापौर हा शिवसेनाच-शिवसेनेचाच होईल" असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले होते.

from Garba Controversy: Virar च्या Viva College मध्ये 'लव्ह जिहाद'चा आरोप, अश्लील चॅटमुळे वाद पेटला https://ift.tt/rwRlGk7

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area