Ads Area

Beed: बीड जिल्ह्यात 183 शस्त्र परवाने रद्द; आणखी 127 रद्द होणार, सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क

Beed: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) यांच्या हत्येनंतर दहशत,सत्ता,पैसा,आणि बीडच्या वाळू माफिया आणि राखेचं भयानक वास्तव समोर आल्यानंतर   मोठी खळबळ उडाली . पवनचक्की प्रकरणाप्रमाणेच बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवणाऱ्यांच्या संख्येत कमी नाही . गेल्या काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबार करणाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओजने मोठी खळबळ माजली होती . सर्रास दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यांमुळे मोठी ओरड सुरू असताना आता संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झाला आहे .बीड जिल्ह्यात 183 शस्त्र परभणी रद्द करण्यात आलेत .आणखी 127 रद्द होणार आहेत . यामध्ये 8 जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केली आहेत .सत्ता सत्ता श्रीमंती आणि वर्चस्व दाखवण्याची हाऊस जपणाऱ्या बीडच्या शस्त्र परवानाधारकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे .

शस्त्र परवान्याबाबत मोठी कारवाई

बीड जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत .यात 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले असून यावर कारवाई करत आत्तापर्यंत 183 शस्त्र रद्द करण्यात आले आहेत .127 शस्त्र रद्द होणार असल्याचा सांगण्यात आलंय . ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे .

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे .घाऊकपणे दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवानांच्या तपासणीसाठी आता पावलं उचलली जात असून आत्तापर्यंत 183 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत .यात मृत असताना हे शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांची संख्या 118 एवढी आहे .

शस्त्र परवाना असणाऱ्यांच्या घरी पोलिसांच्या चकरा

विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे,त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पोलीस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का ?जिवंत आहे का ?याची खात्री करत आहेत . यात अनेक जण मृत असल्याचे समोर आले आहे .मृत असतानाही शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांचा आकडा 118 असल्याचे समजते .त्यामुळे आता हे सर्व शस्त्र परवाने रद्द केले जाणार आहेत .

वाळू माफियांना प्रशासनाच्या सक्त सूचना

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) यांच्या हत्येनंतर दहशत,सत्ता,पैसा,आणि बीडच्या वाळू माफिया आणि राखेचं भयानक वास्तव समोर आल्यानंतर   मोठी खळबळ उडाली . पवनचक्की प्रकरणाप्रमाणेच बीडमध्ये वाळू माफिया आणि राख माफियांची दहशत समोर आल्यानंतर या वाळू तस्करांना कारवाई होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असताना बीड जिल्ह्यातील 21 वाळू तस्करांना पोलीस अधीक्षकांनी इशारा दिला आहे .26 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे . नवे पोलीस अधीक्षक नवनीतकावत यांनी या संपूर्ण प्रकरणाची सूत्रे हाती घेताच जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरोधात मोठी कारवाई केली आहे .

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/ayJglWp Munde: काही लोक सुपारी घेऊन आरोप करतात, कशातही आपलं नाव ओढतात; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

from MPSC : 40 लाखांत एमपीएससी परीक्षेत पास करण्याचं आमिष, भंडाऱ्यातील दोघांना अटक https://ift.tt/W68bZIY

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area