Ads Area

Santosh Deshmukh Murder Case: 41 इंचाचा गॅस पाईप, फायटर, कत्ती, क्लच वायर...; संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांची धक्कादायक माहिती

Santosh Deshmukh Murder Case Updates बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयटीच्या तपासात संतोष देशमुख हत्याबाबत मोठा पुरावा मिळाला आहे. हत्येसाठी कोणकोणती हत्यारे वापरली याची माहिती सीआयडीच्या चौकशीतून समोर आली आहे.

एक गॅसचा पाईप ज्याची लांबी 41 इंच असलेली, त्याची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर कळया करदुडयाने गुंडाळून मुठ तयार केलेली तसेच एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मुठ असलेला पाईप त्यात लोखंडी तारेच 05 क्लच वायर वसवलेले, अशी हत्यारे संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना वापरले. यासोबतच लाकडी दांडा, तलवारीसारखे धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड व कोयता, लोखंडी फायटर, धारदारकत्ती यांचा हत्येसाठी वापर करण्यात आला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासादरम्यान यातील काही गोष्टी पोलिसांना सापडल्या-

तपासादरम्यान एक गॅसचा पाईप, 05 क्लच वायर बसवलेले एक लोखंडी गोलाकर मुठ, लोखंडी रॉड, लाकडी काठी, पांढऱ्या प्लॅस्टीक पाईपचे तुकडे, मयताचे गळयातील पंचरंगी जाड धागा, स्कॉर्पीओ, स्वीफ्ट, 05 मोबाईल पोलिसांना मिळाले.

सीआयडीला आणखी काय मिळालं नाही?

तलवारीसारखे धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड व कोयता, लोखंडी फायटर, धारधारकत्ती हे हत्यारे सीआयडीच्या हातू अजून लागलेले नाही.

वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल-

वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काल (23 जानेवारी) सकाळी वाल्मिक कराडचे मेडिकल चेकअप केले. त्यावेळीच डॉक्टरने वाल्मिक कराडला ताप, सर्दी, खोकला असल्याचे सांगितले होते. मात्र रात्री जेवणानंतर वाल्मिक कराडला पोट दुखीचा त्रास वाढला आणि त्यामुळे डॉक्टरांनी जेलमध्ये त्यांची तपासणी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणले आहे. सध्या वाल्मिक कराडवर आयसीयूमध्ये उपाचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

विष्णू चाटेवर आणखी एका गुन्ह्याची नोंद-

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम-1999 चे कलम 18 नुसार वाल्मिक कराडचा जबाब नोंदविण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी विष्णु महादेव चाटे याने महत्वाचा पुरावा असलेला त्यांचा मोबाईल गहाळ केल्याने त्याच्यावर गुन्हयात कलम 238 बी.एन.एस. 2023 हे कलम वाढविण्यात आले. मोकका गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. विष्णू चाटेवर आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा वाढवण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेऊन तपास करणे असल्याच्या मुद्दा तपास यंत्रणेकडून मांडला गेला. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असुन सखोल तपास करणे बाकी असल्याच्या मुद्दा मांडला गेला.

वाल्मिक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा, VIDEO

संबंधित बातमी:

<a href="https://ift.tt/yJRMsbo Karad : नाश्ता, जेवण आणि बराक नंबर ठरणार, नातेवाईकांची एक भेट आणि तीन फोन करता येणार; वाल्मिक कराडचे कारागृहात काय होणार?

from Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report https://ift.tt/kiXMm6U

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area