Ads Area

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?

मुंबई: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग अर्थात Mumbai Pune Expressway मार्गावर तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या विशेष ब्लॉकमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीत काही बदल करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 27 ते 29 जानेवारी या काळात हा विशेष ब्लॉक असले. हे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक असल्याने वाहतूक वळवली जाईल. त्यानुसार पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली टोलनाका येथून देहू रोडमार्गे वळविली जाईल. दुपारी तीन वाजल्यानंतर पुण्याच्या दिशेची वाहतूक पूर्ववत करुन पुन्हा एक्स्प्रेस वेवरून सोडण्यात येईल.

एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या कामासाठी डोंगरगाव ते कुसगाव हा अंडरपास तोडण्यात आला होता. त्यामुळे आता या भागात स्थानिक वाहतुकीसाठी फ्लायओव्हर्स उभारले जात आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडून कुसगांव हद्दीतील किलोमीटर 58/500 जवळ पुलाचे गर्डर्स बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पुण्याकडे जाणाऱ्यांसाठी कोणत्या महत्त्वाच्या सूचना?

* दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान वाळवण ते वरसोली टोलनाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पुण्याकडे जाऊ शकता.
* पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
* काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी तीन नंतर पुन्हा तुम्ही या महामार्गावरून आपला प्रवास करू शकता.
* ब्लॉक दरम्यान कुठलीही अडचण आल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी 9822498224 या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

मुंबईत मध्य रेल्वेमार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेमार्गावरील कर्नाक पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री 11.30 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 5.30 वाजेपर्यंत सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या शेवटच्या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सीएसएमटीवरुन स्लो ट्रॅकवर रात्री 10.50 वाजता टिटवाळा लोकल तर जलद मार्गावर 10.47 वाजता कसारा लोकल सोडण्यात येणार आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेलच्या दिशेने शेवटची लोकल 10.58 आणि गोरेगावसाठी शेवटची गाडी 10.54 वाजता सोडण्यात येणार आहे. याशिवाय, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी हे तीन दिवस मध्य रेल्वेवर मध्यरात्रीही ब्लॉग असणार आहे.

आणखी वाचा

एसटीचा प्रवास महागला, मध्यरात्रीपासून भाडे वाढ लागू होणार, किती किलोमीटरला किती भाडे वाढले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

from Amol Kolhe On Chhava | छावा चित्रपटाबाबत खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले? https://ift.tt/FrGzBew

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area