Ads Area

'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी

Chhatrapati Sambhajinagar: मला ओळखत नाही का? तुम्हाला सगळ्यांना दोन तासांत ‘सस्पेंड’ करतो असं म्हणत मूर्तीमंत माजात पोलिसांशी अरेरावीने हुज्जत घालणाऱ्या 'VIP' गाडीचालकाने पोलिसांनाच  शिवगाळ करत धमकावले. हिंदीतून बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या' असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. 'साहेबांना बोला' म्हणत बड्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे सरकवला. आलिशान गाडीतून उतर म्हटल्याचा एवढा राग या चालकाच्या डोक्यात होता की गाडीतून न उतरताच पोलिसांना गप्प बस, माझ्या नादी लागू नको असं म्हणत सस्पेंड करण्याची धमकी देण्यापर्यंत या धनाढ्य चालकानं मजल मारली. या घटनेचा व्हिडिओ सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. कुणाल बाकलीवाल असे आरोपीचे नाव असून क्रांती चौक ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  (Crime News)

छत्रपती संभाजीनगर शहरात सुसाट गाड्या चालवणाऱ्यांची कमी नाही. सिग्नल तोडून सायरन वाजवत अनेकजण सर्रास फिरताना दिसतात. वाहतूकीचे नियम फाट्यावर मारत 'आपलंच राज्य' अशा आर्विभावात वावरणारेही खूप आहेत. अशातच पोलिसांची हुज्जत घालत काळ्या आलिशान गाडीतून खाली उतरण्याचे कष्टही न घेता 'पोलीस' या पदाला कचरा असल्याप्रमाणे वागवत धमकावण्यापर्यंत मजल जाते हा चिंतेचा विषय ठरला आहे.

नक्की झाले काय?

छत्रपती संभाजीनगर  शहरात सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत जाणाऱ्या कारचालकाने वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धमकावले. पोलिसांनी गाडीतून खाली उतर सांगितल्यावर बड्या व्यक्तीला फोन लावून पोलिसांना देत त्यांना गप्प बस, माझ्या नादी लागू नको.. पोलीस असाल तर काय माझे बाप झालात की देव झालात अशा भाषेत आलिशान गाडीतून न उतरताच माजात पोलिसांशी अरेरावीने बोलत राहिला. या घटनेचं रेकॉर्डिंग पोलिस करत असल्याचं लक्षात आल्यानंतरही तो थांबला नाही. जनतेच्या पैशातून यांना पगार भेटतो. हे जनतेलाच असं वागवणार का असं फोनवर साहेबांना सांगत मीडियाला बोलवून पंचनामा करेन असं पोलिसांना या वाहनचालकाने धमकावले. या घटनेनंतर पोलिसांनी चालकाला खाली उतरालाच लावले. क्रांती चौक पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Chhatrapati Sambhajinagar)

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/ygEm8W4 Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा उरलेला तुकडा पोलिसांच्या हाती, मुंबई पोलिसांचं एक पथक कोलकाताला रवाना

<a href="https://ift.tt/Sq75b6F Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले

from Ashok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया https://ift.tt/lW4LVX6

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area