Ads Area

परळीत धाकदपट करणाऱ्या वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत, घरात घुसून पिस्तूलाचा धाक दाखवत..

Solapur: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात चांगलेच चर्चेत असून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आणि हत्येचे मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांनी शरणागती पत्करल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून मोठा गदारोळ होत आहे. या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडांविरोधात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आल्यानंतर आता त्यांचा मुलगा सुनिल कराडदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडांच्या मुलाविरोधात (Sunil Karad) सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज करण्यात आला असून सुनिल कराड याने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तूलाच्या धाकाने 2 बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप यात करण्यात आलाय. (Santosh Deshmukh Case)

नक्की प्रकरण काय?

पीडित महिलेने न्यायालयाकडे केलेल्या अर्जानुसार, सुशील कराड याने आपल्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. यावेळी त्याने दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुशील कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्धही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.ऑगस्ट महिन्यात दाखल झालेल्या या अर्जावर अद्याप न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिलेला नाही. मात्र, याबाबतची सुनावणी सुरू आहे. पीडित महिलेने यापूर्वी सोलापूर पोलीस आयुक्त आणि बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. यामुळे न्यायालयाचा आधार घेत तिने खाजगी तक्रार दाखल केली.याप्रकरणी न्यायालयाने सुशील कराड आणि त्याच्या मित्रांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 13 जानेवारी रोजी होणार असून, त्यात एफआयआर दाखल करण्याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.

महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का?

संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग देऊ नये. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाचे शुभेच्छा देण्यासाठी होती का महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का? संतोष देशमुख यांना मारत असल्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत. पोलीस ते व्हिडिओ जनतेसमोर का आणत नाहीत? संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमली त्यामध्ये वाल्मीक कराड सोबत संबंध असलेले अधिकारी बीड मधील लहान मुलांपासून सर्वांना माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे साऱ्यांना माहिती आहे. मग सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे? सा सवालही  छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/zHMrsh3 Chhatrapati : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हेच दुर्दैवी; छत्रपती संभाजीराजेंची उद्विग्न प्रतिक्रिया

from ABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP Majha https://ift.tt/fw1xZN0

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area