<p>Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha</p> <p>उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी दरवाजे कायमचे बंद आणि आम्हाला आता गरजही पडणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आमच्यासाठी दार बंद करा खिडक्या बंद करा, महाराष्ट्राने तुमच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, असा दावाही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. </p> <p>देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाहीय, असं म्हटलं आहे. यावर देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नक्कीच नाहीत. कोण जाणार गुजरात हिताचं बोलणाऱ्या या लोकांकडे ? कोण जाणार आहे महाराष्ट्र द्वेष्टा या लोकांकडे?, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. तसेच तुम्ही आमच्यासाठी खिडक्या बंद करा दरवाजे बंद करा, एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी महाराष्ट्राचे दरवाजे आता बंद आहेत...ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांनी मागच्या दरातून प्रकल्प गुजरातला नेले... त्यांच्याकडे परत कोण जाणार?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. </p>
from Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका https://ift.tt/TJGI7i9
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
November 15, 2024
0