<p>Chhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले </p> <p>विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आचारसंहिता काळात <a title="छत्रपती संभाजीनगर" href="https://ift.tt/EjotcKp" data-type="interlinkingkeywords">छत्रपती संभाजीनगर</a>-जळगाव रोडवर स्थिर पथकाने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी सिल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले आहेत. </p> <p>संभाजीनगर जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना यात 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे असल्याची माहिती सध्या मिळत आहे. सदर सापडलेलं हे सोनं-चांदी जीएसटी विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. </p>
from Maharashtra News Live Updates :आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार https://ift.tt/61NklLt
Chhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले
November 14, 2024
0