मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेल्या मुंबई उपनगर परिसरातील निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघांचे निकाल मुंबई कोणाकडे राहणार, हे निश्चित करेल. मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांमधून (Mumbai Suburban District) एकूण 315 उमेदवार रिंगणात उतरले होते. जो पक्ष मुंबई उपनगर परिसरातील जास्तीत जास्त जागा जिंकेल, त्या पक्षाचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वरचष्मा राहतील. यादृष्टीने मुंबई उपनगर परिसरातील 26 मतदारसंघाचा निकाल हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुंबई उपनगरात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 12, शिवसेनेचे 9, काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे यंदा काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यंदा मुंबई उपगनगरात मुख्य लढत ही ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपमध्ये असेल. महायुती आणि महाविकास आघाडीच्यादृष्टीने मुंबई उपनगरातील अनेक मतदारसंघ हे प्रतिष्ठेचे मानले जात आहेत. बोरिवली, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मानखुर्द शिवाजीनगर आणि वांद्रे पूर्व या मतदारसंघांमध्ये काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई शहरातील 10 आणि मुंबई उपनगरातील 26 असे एकूण 36 मतदारसंघ मिळून मुंबईच्या राजकारणावर आगामी काळात कोणाचा पगडा राहणार, हे निश्चित करतील. यंदाच्या निवडणुकीतील 'बटेंगे तो कटेंगे', 'व्होट जिहाद' हे मुद्दे मुंबई शहर आणि उपनगर परिसरात कितपत प्रभावी ठरणार, हे पाहावे लागेल.

मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांचा निकाल खालीलप्रमाणे

बोरिवली विधानसभा मतदारसंघ-

दहिसर विधानसभा मतदारसंघ-

मागाठाणे विधानसभा मतदारसंघ-

कांदिवली विधानसभा मतदारसंघ-

चारकोप विधानसभा मतदारसंघ-

मालाड विधानसभा मतदारसंघ-

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ-

दिंडोशी विधानसभा मतदारसंघ-

गोरेगाव विधानसभा मतदारसंघ-

वर्सोवा विधानसभा मतदारसंघ-

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ-

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ-

मुलुंड विधानसभा मतदारसंघ-

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ-

भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ-

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ-

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ-

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ-

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ-

चांदिवली विधानसभा मतदारसंघ-

कुर्ला विधानसभा मतदारसंघ-

कलिना विधानसभा मतदारसंघ-

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ-

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ-

चेंबुर विधानसभा मतदारसंघ-

Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.

आणखी वाचा

<a href="https://ift.tt/cyKiUeR Assembly Election Result 2024 LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 आज; गुलाल कुणाचा? सत्तेच्या चाव्या कुणाकडे? काही तासांत स्पष्ट होणार...

from Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण? https://ift.tt/gaZIVfD
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election Results 2024: मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर
November 22, 2024
0