Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. राज्यातील जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार? विजयाचा गुलाल कोण उधळणार? पुढची पाच वर्ष कोण राज्याचा गाडा हाकणार? नवा मुख्यमंत्री कोण असणार? हे आज निवडणुकांच्या निकालाअंती जाहीर होणार आहे. यंदा महाराष्ट्र (Maharashtra Election 2024) विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे. राज्यातील एकूण 288 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकांची चुरस पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांची महायुती वि काँग्रेस, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी अशी महविकस आघाडी (Maha Vikas Aaghadi) मैदानात उतरली. दुसरीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे (MNS) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) यांनी सुद्धा उमेदवार उभे करून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 288 सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 145 ही मॅजिक फिगर आहे. ही मॅजिक फिगर कोण गाठणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतमोजणी जाहीर केली जाणार आहे. राज्यातील जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार? विजयाचा गुलाल कोण उधळणार? पुढची पाच वर्ष कोण राज्याचा गाडा हाकणार? नवा मुख्यमंत्री कोण असणार? हे आज निवडणुकांच्या निकालाअंती जाहीर होणार आहे. ABP माझावर क्षणोक्षणीचे अपडेट्स तुम्ही पाहू शकणार आहात. तसेच, एबीपी माझा डिजिटलवरही तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेऊ शकणार आहात.

राज्यानं गेल्या अडीच वर्षांत अभूतपूर्व सत्तासंघर्ष पाहिला आहे. अशातच ज्या घडामोडींमुळे सत्तासंघर्ष उद्भवला, त्या घडामोडी म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील बंडाळी. अगदी शिवसेनेतील फुटीपासून महाविकास आघाडी कोसळणं आणि थेट शिवसेनेतील प्रबळ नेतृत्त्व असलेले एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यापर्यंत अनेक हादरवणाऱ्या घटना महाराष्ट्रानं याची देही, याची डोळा अनुभवल्या. आता या सर्व धक्कादायक आणि अनाकलनीय घटनांनंतरची यंदाची पहिली विधानसभा निवडणूक पार पडत आहे. अशातच, आता मतदार राजाचा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे यंदा मतदार राजा सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

युट्यूब लाईव्ह : https://www.youtube.com/watch?v=m0MD6Ukm0cQ

ABP Majha ट्वीटर : https://ift.tt/bskzlN0>
ABP Majha फेसबुक : https://ift.tt/e9ra8xN>
from Kisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी? https://ift.tt/jnuEdIz
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 आज; गुलाल कुणाचा? सत्तेच्या चाव्या कुणाकडे? काही तासांत स्पष्ट होणार...
November 22, 2024
0