Ads Area

विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले

Waris Pathan Emotional During Prachar Rally: राज्यात विधानसभा निवडणुकांचा (Vidhan Sabha Election 2024) धुरळा उडणार आहे. अशातच आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यापूर्वी काल प्रचाराचा सुपरसंडे होता. अनेक दिग्गजांनी मतदारराजाला साद घातली. तर, भिवंडी पश्चिम मतदारसंघातील (Bhiwandi West Constituency) एमआयएमचे उमेदवार (MIM Candidate) वारिस पठाण (Waris Pathan) मात्र, प्रचार रॅलीज भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांकडून मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांनी केला आहे. जाणीवपूर्वक प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जात असल्याचं म्हणत वारिस पठाण भावूक झाले.

विरोधक आपल्याला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भिवंडी पश्चिम मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण रडले. आपण इथे सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी आलोय. परंतु जाणीवपूर्वक आपल्या प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जाते. प्रचारात वाहनं घुसवली जातात. भाजपला आपणच हरवू शकतो, हे माहीत असल्यानं भाजपसह सर्व विरोधी उमेदवार एकत्र आले आहेत, असं वारीस पठाण यांनी म्हटलं आहे. तसेच, आपल्याला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा असून विजय आपलाच होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण यांना रडू कोसळलं

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी रात्री आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एमआयएम पक्षाचे उमेदवार वारिस पठाण यांनी सर्व विरोधक मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यावेळी वारिस पठाण काहीसे भावूक झाले आणि भर पत्रकार परिषदेत त्यांना रडू कोसळलं. मी इथे सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी आलो आहे.पण, जाणीवपूर्वक माझ्या प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जाते, माझ्या प्रचारात वाहनं घुसवली जातात. मी या भिवंडी शहराला बदलण्यासाठी आलोय. इथे चांगल्या आरोग्य सुविधा, शहरं,  स्वच्छता, चांगलं शिक्षण मिळावं यासाठी मी इथे आलो आहे. चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय, हाच माझा दोष आहे. मला रोखण्याचा प्रयत्न भाजपसोबतच सर्व विरोधक करत आहेत. भाजपाला मीच हरवू शकतो, हे माहीत असल्यानं भाजपसह सर्व विरोधी उमेदवार एक झाले आहेत. पण येथील निवडणूक जनतेने हाती घेतली असल्यानं, मी जिंकणार आहे, मला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आहे, असा विश्वास वारीस पठाण यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम आणि मिरा भाईंदर मतदारसंघ काँग्रेसला सुटला. काँग्रसेने ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांना भिवंडीतून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात 52 टक्के मुस्लिम समाज वास्तव्यास असल्याने मुस्लिम चेहरा येथून दिला जावा अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी करत होते. मात्र, मराठी चेहरा दिल्यानं मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच, आता भिवंडीचं मैदान कोण मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

from Special Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी? https://ift.tt/rymnARg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area