<p>TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 10 ऑक्टोबर 2024 : ABP Majha</p> <p>महायुतीमध्ये नाशिक जिल्ह्यात वादाची ठिणगी पडलीय. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नांदगाव-मनमाड मतदारसंघाचा उल्लेख केला होता. नेमक्या याच उल्लेखानंतर समीर भुजबळ नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार का अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळं या मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे संतापले आहेत. सुहास कांदे यांनी समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याऐवजी थेट छगन भुजबळ यांनीच उभं राहावं असं आव्हान दिलं आहे. भुजबळ यांना निवडणुकीत पाडू शकतो, असं चॅलेंज देखील कांदे यांनी दिलं. </p> <p>शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिलं आहे. समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, मी त्यांच्यासमोर उमेदवारी करायला तयार आहे, असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास मी कधीही, कुठेही तयार आहे. निवडणुकीत मी छगन भुजबळांना पाडू शकतो, असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.</p>
from ABP Majha Headlines : 8 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/kXqptfI
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 10 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
October 09, 2024
0