<p>Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 28 ऑक्टोबर 2024 : ABP Majha</p> <p>आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Nivadnuk 2024) पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात (Maharshtra News) विविध पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, विविध ठिकाणी पार पडणाऱ्या सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या जात आहेत. अशातच नांदेडमधून (Nanded) माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे, मी भाजपाच्या (BJP) त्रासाला नाही तर काँग्रेसच्या त्रासाला कंटाळून पक्ष बदलला, असा गौप्यस्फोट देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे. </p> <p>मी पक्ष सोडला म्हणून मला संपवण्याचं फर्मान दिल्लीहून निघालं, पण मी संपणार नाही, असा इशारा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांना दिला. भोकरमध्ये आयोजित जाहीर सभेत अशोक चव्हाण बोलत होते. नांदेडला टार्गेट केलं जात आहे. आता तेलंगणाचे सगळे हीरो, हीरोईन येणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री काम सोडून इथे येणार आहेत. त्यांचा मुक्काम भोकर राहणार आहे. कारण अशोक चव्हाण यांना संपवायचं आहे. आणि हे फर्मान दिल्लीहून निघाला आहे. आमच्या पक्षातून अशोक चव्हाण गेला, याला संपवा असं फर्मान निघालं आहे. पण मी संपलो नाही आणि संपणार नाही, असं आव्हान अशोक चव्हाण यांनी काँगेस नेतृत्वाला दिलं आहे. </p>
from Top 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 27 OCT 2024 ABP Majha https://ift.tt/mXkzsKU
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 28 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
October 27, 2024
0