मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. सिद्धी या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या कन्या आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. सोमवारी सकाळी मोहोळ विधानसभेतील (Mohol Vidhan Sabah) नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. शरद पवार यांनी या सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सिद्धी कदम (Siddhi Kadam) यांची उमदेवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी रमेश कदम यांचा नावे देण्यात आलेला एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा, असे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवले. त्यामुळे सिद्धी कदम यांच्याऐवजी आता शरद पवार गटाकडून मोहोळमधून कोणता उमेदवार रिंगणात उतरवला जाणार, हे पाहावे लागेल. तत्पूर्वी सिद्धी कदम यांनी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सोमवारी आपला उमेदवार अर्ज भरला. मात्र, आता शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे रमेश कदम आणि सिद्धी कदम काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

वडील तुरुंगात असताना प्रचाराची सूत्रं सांभाळणारी लेक

सिद्धी कदम या वयाने लहान असल्या तरी त्यांना निवडणुकीची प्रचार मोहीम हाताळण्याचा अनुभव होता. सिद्धी कदम हिने गत 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्धच प्रचार यंत्रणा राबवून तगडी फाईट दिली होती. विद्यमान आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांनाच वडिलांसाठी टक्कर दिली होती. कारण, 2019 साली सिद्धीचे वडील रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकारणात अटकेत होते, तेव्हा विधानसभा निवडणुकांची धुरा सिद्धीनेच सांभाळली. त्यावेळी अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना 23 हजारांहून अधिक मतं मिळाली होती, त्यामध्येही सिद्धीच्या उत्तम नियोजनाचा व सोशल बॉण्डिंगचा मोठा वाटा राहिला आहे.

कोट्याधीश वडिलांच्या लेकीची संपत्ती अवघी 1 लाख

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाने यंदाच्या निवडणुकीत सर्वात तरुण उमेदवाराला संधी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम या अवघ्या 26 वर्षीय तरुणीला शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी सिद्धी कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सिद्धी यांनी शपथपत्रात स्वतःविषयी संपूर्ण माहिती नमूद केली. त्यांचे शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून मास्टर ऑफ आर्ट्स इन वुमन स्टडीज संस्थेतून झाले आहे.

त्यांच्याकडे एक लाख 99 हजार एकशे अकरा रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर कोणती स्थावर मालमत्ता नसून कुठल्याही पद्धतीचे कर्ज किंवा गुन्ह्यांची नोंद देखील त्यांच्या नावावर नसल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रांमध्ये सांगितले आहे. सिद्धी कदम यांच्या नावावर कुठली संपत्ती नसली तरी त्यांचे वडील माजी आमदार रमेश कदम यांनी पूरक म्हणून स्वतःचे अर्ज दाखल केले आहे. यासोबत जोडलेल्या शपथपत्रांमध्ये रमेश कदम यांनी त्यांच्यावर बारा गुन्ह्यांची नोंद असून एका गुन्ह्यात शिक्षा लागल्याची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे 14 लाख 38 हजार 447 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर त्यांच्या नावावर चार कोटी 17 लाख 65 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, ही स्थावर मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आल्याचे देखील त्यांनी आपल्या शपथपत्रांमध्ये सांगितले आहे.

आणखी वाचा

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला

from ABP Majha Headlines : 11 PM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/0F51jbd
Sharad Pawar NCP Candidate List: शरद पवारांनी ऐनवेळी मोहोळचा उमेदवार बदलला, सिद्धी कदमांचा पत्ता कट; निवडणूक आयोगाला तातडीने धाडलं पत्र
October 28, 2024
0